Monday, 19 August 2019

महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Marathi Essay

Today, we are publishing महात्मा गांधी निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay on Mahatma Gandhi in Marathi language in completing their homework and in competition.

महात्मा गांधी निबंध मराठी - Mahatma Gandhi Marathi Essay

महात्मा गांधीजींना आपण सर्व राष्ट्रपिता' म्हणून ओळखतो तसेच महात्मा गांधीजी 'बापू' या नावानेही ओळखले जात. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच आज्ञाधारक होते. त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय होती. त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती तसेच खरे बोलायची सवय होती.
Read also : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Marathi Essay
महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली. तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.

भारतात परत आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. सत्याग्रह व असहकाराच्या चळवळीमुळे सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वातंत्र्याची लढाई लढताना गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. अनेक हालअपेष्टा कराव्या लागल्या. मिठाचा कायदा मोडल्यानंतर गांधीजींचे अनुयायी अधिकच वाढले. मोठमोठ्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, लाला लजपतराय, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी त्यानां आपला पाठिंबा दिला. 
स्वतंत्र भारताचे गांधीजीचे स्वप्न होते. गांधीजींना देश नुसता स्वतंत्र नाही तर स्वावलंबी करायचा होता. त्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन चरख्याचा संदेश दिला. अनेक लोकांना स्वावलंबी केले. ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वत: त्यांनी भारी वस्त्रांचा त्याग करून नुसते धोतर व अंगावर पंचाघेऊन ते राहू लागले.

गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती यांचा आयुष्यभर प्रचार केला व स्वत:ही हीच शिकवण आचरणात आणली. 'आधी करावे मग सांगावे', असे त्यांचे आचरण होते.
महात्मा गांधीजींच्या देशप्रेमाने व चळवळीने अखेर देश जागृत झाला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण देशासाठी त्याग करणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळाल्यावर फार दिवस आपल्यात राहिले नाहीत. ३० जानेवारी, १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना त्यांची हत्या झाली. यमुना नदीच्या जवळ राजघाटावर गांधीजींची समाधी बांधण्यात आली. सर्व जगाला वंद्य असणारे व भारतीयांना अभिमान बाटणारे गांधीजी हे एक महान पुरुष होते.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: