Essay on Autobiography of a student in Marathi : In this article " मी विद्यार्थी बोलतोय मराठी निबंध ", " Mi Vidyarthi Boltoy ...
Essay on Autobiography of a student in Marathi: In this article "मी विद्यार्थी बोलतोय मराठी निबंध", "Mi Vidyarthi Boltoy Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Autobiography of a student", "मी विद्यार्थी बोलतोय मराठी निबंध", "Mi Vidyarthi Boltoy Marathi Nibandh" for Students
मी राधा किसन जाधव. मी इयत्ता ५ वी अ मध्ये शिकत आहे. मी या वर्गाची वर्गप्रतिनिधी आहे. जूनमध्ये आमच्या वर्गशिक्षकांनी निवडणूक घेतली. मुलींनीच मला निवडून दिलं. वर्गात शिक्षक नसताना वर्ग शांत ठेवण्याची माझी जबाबदारी असते. मी वर्ग शांत तर ठेवतेच; पण मराठीच्या तासापूर्वी आम्ही मुली कविता म्हणतो, तर गणिताच्या तासापूर्वी पाढे पाठ करतो. दोन तासिकांमधला वेळ फळ्यावर इंग्रजी स्पेलिंग्ज लिहून घेणे, मराठी वाक्प्रचार पूर्ण करणे, म्हणींचा अर्थ सांगणे असे खेळही शांतपणे खेळतो. वर्गात वर्गशिक्षक येण्यापूर्वी मी रोजचा दिनांक, वार आणि एक सुविचार लिहिते. त्या सुविचाराचा अर्थ आमच्या मॅडम आम्हाला सांगतात. माझ्याकडे तर सुविचारांची छान वहीच आहे.
बऱ्याचदा शिक्षक मला इंग्रजीचे निबंध फळ्यावर लिहून दयायला सांगतात. माझे हस्ताक्षर चांगले आहे आणि मी वर्गप्रतिनिधी असल्याने मुलींच्या गृहपाठाच्या वह्या गोळा करण्याचे कामही करते.
मुलींना काही अडचण असेल तर त्या मला सांगतात आणि मग मी आमच्या मॅडमना सांगून ती अडचण दूर केली जाते. माझ्या सगळ्या मैत्रिणी चांगल्या आहेत. त्यांचे मला चांगले सहकार्य मिळते. मी वर्गप्रतिनिधी म्हणून 'भाव' खात नाही.
वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी नेहमी भाग घेते. वर्ग सजावटीतही आमच्या वर्गाचा प्रथम क्रमांक असतो. आमचा वर्ग आदर्श वर्ग राहावा म्हणून प्रयत्न करते. माझा अभ्यास वेळेत पूर्ण असतो. म्हणूनच मी सगळ्यांची लाडकी विद्यार्थिनी आहे. मला शाळेत जायला खूप आवडते.
COMMENTS