Saturday, 8 February 2020

मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध Mi Samaj Sevak Zalo Tar Marathi Nibandh

Mi Samaj Sevak Zalo Tar Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध लेखन  For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Samaj Sevak Zalo Tar Marathi Nibandh Lekhan to complete their homework. 

मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध Mi Samaj Sevak Zalo Tar Marathi Nibandh

समाजसेवक म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात काही ठळक नावे, जसं की मदर तेरेसा, बाबा आमटे, अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ, अभय बंग, इ. निरपेक्ष भावनेने, निःस्वार्थपणे, चिकाटीने जो समाजातील उपेक्षित व गरजू वर्गासाठी अविरत झटतो, समाजाच्या भल्याचा विचार रात्रं-दिवस करतो, तो समाजसेवक होय.
Read also : माझा आवडता छंद मराठी निबंध
भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध लढणारे अण्णा हजारे आणि भ्रष्टाचाराबरोबरच समाजाच्या निरोगी स्वास्थ्यासाठी समाजामध्ये आरोग्यसंपन्न शरीरसंपदेबाबत जागृती निर्माण करणारे निःस्वार्थ योगी बाबा रामदेव. या दोघांनीही समाजाप्रति आपले कर्तव्य चोख पार पाडले आहे.
मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ यांचे जीवन पाहिले अन् मलाही वाटले, आपण समाजसेवक झालो तर...
समाजसेवक होण्यासाठी कोणती गुणवत्ता मला वाढवायला हवी? मग मी स्वतःलाच काही प्रश्न विचारले.
मला समाजात वावरायला आवडते का? मला दुसऱ्यांचे दुःख पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न करावासा वाटतो का? मला सामाजिक समस्या सोडवता येतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मला सकारात्मकच मिळाली आणि म्हणूनच मी समाजसेवकाचं व्रत स्वीकारून काय करेन, हे ठामपणे सांगू शकतो.
Read also : सूर्य संपावर गेला तर निबंध
माझ्या मते, समाजसेवक स्वतः प्रखर उन्हात उभा राहून इतरांना गर्द सावली देणारा, पाने, फुले, फळे एवढेच नव्हे तर स्वतःचे संपूर्ण शरीर इतरांसाठी खर्ची घालवणाऱ्या डेरेदार वृक्षाप्रमाणे असावा.
'नदीयाँ न पिती कभी अपना जल
वृक्ष न खाते कभी अपना फल'
अशा वृत्तीचा तो असावा. म्हणूनच मीसुद्धा माझे जीवन महात्मा जोतीराव फुलेंसारखे समाजाच्या सेवेसाठी अर्पण करेल.
आज मेधा पाटकरांसारखी समाजसेविका नर्मदा आंदोलन करून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झटताना दिसते.
आज अनेक सामाजिक प्रश्न ऐरणीवर आहेत. महागाई, पाणीटंचाई, निरक्षरता, लोकांचे हक्क, सामाजिक विषमता, गरिबांच्या समस्या या गोष्टींचा समाजावर होणारा परिणाम पाहता त्या समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
Read also : वीज नसती तर मराठी निबंध
आज अनेक पदव्या प्राप्त करूनही तरुणांना नोकऱ्या नाहीत; बेरोजगारी वाढली आहे. कष्ट करणाऱ्या हातांना काम नाही; त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. अशांना नोकरीपेक्षा व्यवसाय श्रेष्ठ आहे, हे मी पटवून देईल. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची माझी जबाबदारी मी निश्चितच पार पाडेल.
बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, होतकरू तरुणांसाठी सरकारच्या विविध योजना असतात. त्या त्यांना समजणे गरजेचे असते, त्यांची त्यांना ओळख करून देणे हे माझेच कर्तव्य असेल.
समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करून एक निकोप समाज घडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: