Maza Avadta Ritu Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता ऋतू मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Student...
Maza Avadta Ritu Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता ऋतू मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Ritu Marathi Nibandh (Essay) Essay in Marathi Language to complete their homework.
माझा आवडता ऋतू मराठी निबंध Maza Avadta Ritu Marathi Nibandh
'गिरीशिखरांवरुनी सोगे सुटले ढगांचे,
ओले, हिरवे दिवस, येती जाती श्रावणाचे
कवी वा. रा. कांत यांनी श्रावण महिन्यातील निसर्गाचे किती मनोहारी वर्णन केले आहे, नाही?
ज्याच्या आगमनाच्या वेळी ढगांचे नगारे वाजतात आणि अमृताचा अभिषेक होतो, तो माझा आवडता ऋतू वर्षाऋतू.
Read also : माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी
Read also : माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी
चैत्र महिन्यात गावोगावी जत्रा आणि यात्रांची लगबग असते. वैशाखातील गुलमोहोर आपल्या रंगीबेरंगी फुलांनी सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर वैशाख वणव्याने, कडक उन्हाने तापून, होरपळून गेलेली पृथ्वी शीतलतेला आसुसलेली असते. येणारा वर्षाऋतू त्यांचे हिरवे स्वप्न सत्यात उतरवणार असतो आणि मग तो येतो, बरसतो.
'आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने,
प्यावा वर्षाऋतू तरी.'
आसुसलेल्या मनानं कवी बा. सी. मर्डेकर पर्जन्यराजाचं स्वागत करतात. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे साधारणतः पावसाचे महिने. वसुंधरेने हिरवागार शालू पांघरलेला असतो. सणांचे, उत्साहाचे, आनंदाचे, व्रतवैकल्यांचे हे महिने. अक्षत्व प्राप्त झालेल्या वटवृक्षाची पूजा ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी मनोभावे करतात.
आषाढातले मेघ भारीच खोडकर! कुठून, कसे आणि केव्हा येतील याचा नेम नाही. या महिन्यात येणाऱ्या एकादशीला आणि गुरुपौर्णिमेलाही विशेष महत्त्व असते.
दिव्यांची अमावास्या सर्वत्र रोषणाई करून दीपोत्सवाने साजरी होते.
Read also : माझी सहल मराठी निबंध
श्रावण महिन्यात निसर्गाला सम्राटाचे वैभव प्राप्त झालेले असते. हिरव्यागार वनश्रीला जरतारी साज चढतो. श्रावणातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. म्हणूनच बालकवी म्हणतात,
Read also : माझी सहल मराठी निबंध
श्रावण महिन्यात निसर्गाला सम्राटाचे वैभव प्राप्त झालेले असते. हिरव्यागार वनश्रीला जरतारी साज चढतो. श्रावणातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. म्हणूनच बालकवी म्हणतात,
'श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे ।
नागपंचमी हा नागांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण. शेतकरी बंधू, शेती सुपीक करण्यास साहाय्य करणाऱ्या नागांचे पूजन करतात, तर नारळी पौर्णिमेला समुद्राला, सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून कोळीबांधव आपल्या व्यापारधंद्याच्या भरभराटीची प्रार्थना करतात. याच दिवशी भावा-बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन हा सण ही असतो.
श्रीकृष्णाला वंदन करण्याचा मंगल दिवस म्हणजे गोकुळाष्टमी.
हसरा श्रावण संपला की, मंगल भाद्रपद येतो. हा मंगल-मूर्तीचा, महालक्ष्मी, पितृपूजेचा महिना.
Read also : माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू मराठी निबंध
आकाशाचा दुधाळ डेरा घुसळून-घुसळून अमृतधारांचा वर्षाव धरणीवर होतो. लाख अंकुरांनी धरणी नटून खरीप पिकांनी बहरून जाते. हे सारंच कसं आनंददायी असतं. म्हणूनच पावसाची विविध रूपं अनुभवायला, सणांचा आनंद लुटायला, चिंब चिंब भिजायला मला वर्षाऋतू आवडतो.

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यात सांगायचं झालं तर,
'सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
COMMENTS