Mi Pahileli Jatra Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 &...
Mi Pahileli Jatra Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Pahileli Jatra Marathi Nibandh Lekhan to complete their homework.
मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध लेखन Mi Pahileli Jatra Marathi Nibandh Lekhan
'येळकोट, येळकोट, जय मल्हार'
जेजुरी गडावर खंडोबाच्या नावाचा गजर होत होता. खोबरे, भंडारा उधळला जात होता. जेजुरी हळदीमुळे सोन्याची भासत होती. ते भारावलेलं वातावरण पाहून मला आमच्या गावातल्या जत्रेची आठवण झाली.
आता आम्ही शहरात राहतो; पण दरवर्षी न चुकता आमच्या ग्रामदैवताच्या जत्रेला मात्र हजर राहतो. चैत्र महिन्यात पौर्णिमेला ही जत्रा भरते.
आजूबाजूच्या गावातील लेकी-बाळीसुद्धा देवाच्या दर्शनासाठी येतात. हे ग्रामदैवत 'जागृत' आहे म्हणे. सगळ्यांचे नवस पूर्ण होतात, असं ऐकिवात आहे.
Read also : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
Read also : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
जत्रा म्हणजे नुसती धम्माल असते. रस्त्यावरून वाट काढत गावातून फेरफटका मारण्यात काय मजा असते ते सांगून समजणार नाही, त्यासाठी 'अनुभव' घ्यावा हेच बर!
गावातील सगळी दुकाने त्या दिवशी रस्त्यावर ठाण मांडून सजलेली असतात. अगदी भाड्यांची, प्लॅस्टिक, पितळी, मातीची तर मिठाईवाले गरमागरम मिठाई बनवून ग्राहकांना खूश करण्याच्या प्रयत्नात असतात. भेळवाले चटपटीत भेळ बनविण्यात मश्गूल मालेले दिसतात. शेव, रेवड्या, गजरे, फुले, नारळ, बुक्का, कचकड्याची खेळणी, पिपाण्या, रंगीत चश्मे, बांगड्या, टब, बादल्या, गोलगोल फिरणारे पाळणे, फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरही तिथं हजर असतात.
Read also : एक रम्य पहाट मराठी निबंध
Read also : एक रम्य पहाट मराठी निबंध
त्या दिवशी 'बगाड' असते. बगाड म्हणजे लाकडी जोताला माणसाला बांधून वर उंच आकाशात नेतात, हळूहळू सगळे मिळून त्याला खाली उतरवतात. त्याच्याकडून देवाची पूजा होते, तो मान त्यांना वंशपरंपरेने, वारसा हक्क म्हणून चालत आलेला असतो. त्या माणसाला जेव्हा वर उचललं जातं, ती गंमत बघण्यासाठी आख्खं गाव तिथं जमलेलं असतं. त्यावेळी एकच कल्लोळ होतो. देवाचा गजर केला जातो. दरवर्षी आम्ही न चुकता या जत्रेला हजर राहतो. आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण हा दिवस, हा आनंद अवर्णनीय असतो..
देवाचे मंदिर महिनाभर आधीच स्वच्छ करून रंगवले जाते, सजवले जाते. गावातील सगळी तरुण मंडळी स्वतःहून पुढाकार घेतात. जत्रेचे नियोजन करतात. कामाची वाटणी करून, शिस्तबद्ध जत्रा घडवून आणतात.
मंदिरात देवासमोर नारळ फोडले जातात. गावातील प्रतिष्ठित मंडळींनी देवाची पूजा केल्यानंतर सर्वांसाठी देवदर्शन खुले होते. मोठमोठ्या रांगा लावून लोक देवाचं दर्शन घेतात.
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
गावाच्या रक्षणाचे, समृद्धीचे, शांततेचे साकडे देवाला घातले जाते. देवदर्शनानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गावातून फेरफटका मारतो. आई, आजीकडून खरेदीसाठी, खाऊसाठी पैसे घेतलेलेच असतात. मग कधी भेळ तर कधी जिलेबी तर कधी आइस्क्रूट खात, बांगड्या, कानातले याची खरेदी होते. ही खरेदी कधी आईसाठी तर कधी ताईसाठी, तर कधी स्वतःसाठी केलेली असते. आम्ही गोल पाळण्यात बसून संपूर्ण गावाचं ते मनोहारी दृश्य डोळ्यात साठवतो. दूरवर पसरलेली हिरवीगार शेते, अमृतवाहिनी नदी, छोटी-छोटी घरे, देवळाचा कळस हे सगळं भरभरून आनंद देतं. म्हणूनच आम्ही दरवर्षी हा आनंद लुटण्यासाठी, दूषित अन्नपाण्यापासून सुटका करून, शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि चुलीवरच्या स्वयंपाकाचा आनंद लुटण्यासाठी दोन दिवसांसाठी का होईना, गावाला आवर्जून येतो. जाताना आनंद, समाधान, तृप्ती आणि प्रसन्नतेची शिदोरी बरोबर घेऊन शहराकडे परततो.
COMMENTS