Maza Avadta Khel Cricket Marathi Nibandh : Today, we are providing माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 1...
Maza Avadta Khel Cricket Marathi Nibandh: Today, we are providing माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Khel Cricket Marathi Nibandh to complete their homework.
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध लेखन Maza Avadta Khel Cricket Marathi Nibandh
तुम्हा मुलांना जर मी प्रश्न विचारला की, “सचिन तेंडुलकर कोणता खेळ खेळतो?" तर तुम्हाला वाटेल, मी काय तुमची गंमत करतोय का? हा काय प्रश्न आहे? या प्रश्नाचं उत्तर न येणारी व्यक्ती तरी असू शकेल का?
आपल्या सर्वांनाच क्रिकेट या खेळाचे आकर्षण आहे. खरं तर आपल्या देशाला विविध खेळांची परंपरा आहे. महाराष्ट्रात म्हणाल तर खेळांचे दोन भागात विभाजन करता येईल. मैदानी खेळ म्हणजे घराबाहेर, मैदानावर, खुल्या जागेत खेळले जाणारे खेळ. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन; गावाकडे खेळले जाणारे आट्यापाट्या, लपाछपी, सूर-पारंब्या, लगोरी हे खेळ मोकळ्या जागेत खेळता येतात. तर कॅरम, बुद्धिबळ, व्यापार, पत्ते, काचाकवड्या, सागरगोटे हे खेळ आपण घरात बसून खेळू शकतो.
Read also : My Favourite Hobby Marathi Essay
मैदानी खेळ मुलांनी आणि बैठे खेळ मुलींनी खेळावेत, असा पूर्वी एक सर्वसाधारण समज होता. अर्थात तो दोघांच्याही शारीरिक ठेवणीनुसार झाला असावा; पण आताच्या पिढीने तो समज खोडून काढलाय. ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धामध्ये मुलींना मिळालेली पदके ही खूपच बोलकी उदाहरणे आहेत.
Read also : My Favourite Hobby Marathi Essay
मैदानी खेळ मुलांनी आणि बैठे खेळ मुलींनी खेळावेत, असा पूर्वी एक सर्वसाधारण समज होता. अर्थात तो दोघांच्याही शारीरिक ठेवणीनुसार झाला असावा; पण आताच्या पिढीने तो समज खोडून काढलाय. ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धामध्ये मुलींना मिळालेली पदके ही खूपच बोलकी उदाहरणे आहेत.
वटलेफ्टिंगसारख्या ताकदवान क्रीडा प्रकारात मल्लेश्वरी, तर बुद्धिबळाचा राजा विश्वनाथ आनंद यांना पाहताना लक्षात येते की, कोणी कुठलाही खेळ मनापासून खेळला तर त्यात सहज प्रावीण्य मिळवू शकतो. .
झिम्मा, फुगडी यासारखे मंगळागौरीच्या रात्री जागून खेळले जाणारे खेळही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. हे खेळ खेळताना पारंपरिक गाणी म्हणतात, त्यातून आनंद मिळवतात.
Read also : मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध लेखन
Read also : मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध लेखन
मला मात्र चेंडुफळी' म्हणजे क्रिकेट खेळच आवडतो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर गल्लीबोळात, अपुऱ्या जागेत (रस्त्यावरही!) अनेक मुलं हा खेळ मन लावून खेळताना दिसतील. त्यांच्या जवळ स्टंप, सिझनचा बॉल, किमती बॅट नसली तरी चालेल. एखादं फळकुटं, साधा चेंडूसुद्धा त्यांना खूप आनंद देऊ शकतो. या खेळाची जादूच तशी आहे. खरं तर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ. पण 'हॉकी' खेळाची कॉमेंट्री ऐकताना तुम्ही कधी कोणाला पाहिलंय का? या उलट इंग्रजांनी भारतात आणलेला खेळ अल्पावधीत लोकप्रिय झाला. प्रत्यक्ष सामना पाहता आला नाही तरी रेडिओवरून त्या सामन्याचे समालोचन ऐकणारे बसमध्ये रेल्वेमध्ये, कार्यालयात, रस्त्यावर, कुठेही दिसतील.
पूर्वी क्रिकेटचे पाच-पाच दिवसांचे कसोटी सामने रंगायचे. ते पाचही दिवस जिकडे-तिकडे त्या खेळाची चर्चा रंगायची. इतकी की आपण तिथं असतो तर कसं खेळलो असतो किंवा अंपायरचा निर्णय चुकीचा कसा इ. इ.
आता ट्वेंटी-ट्वेंटी ओव्हर्सचे ३-४ तास खेळ खेळून निकालही लगेच ऐकायला मिळतो.
११-११ खेळाडूंचे दोन संघ नाणेफेकीनंतर एकमेकांविरुद्ध जेव्हा आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करतात, तेव्हा प्रेक्षकही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देतात. ते सामने खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय ठरतात.
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा आपल्या सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर जेव्हा आपल्या बॅटने चौकारांचा, षटकारांचा मारा करतो तेव्हा तर . आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं; त्याची बॅट तळपत असते नुसती! शतक केल्यावर आभाळाकडे पाहत तो जेव्हा देवाचे आभार मानतो, तेव्हा सगळे लोक त्याच्यावर मनापासून कौतुकाचा वर्षाव करतात.
क्रिकेटचे मैदान गाजवणारे सुनील गावसकर, अजित वाडेकर, हरभजनसिंग, महेंद्र धोनी, सौरव गांगुली, रवी शास्त्री अशी कितीतरी 'रत्ने' या देशाला मिळाली.
कपिल देव यांनी १९८३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडीजच्या संघाला पाणी पाजून 'विश्वचषक' जिंकण्याची महान कामगिरी केली होती, तर २०११ मध्ये 'विश्वचषक जिंकण्यासाठी सचिन तेंडुलकरचे मोठे योगदान होते.
खेळांमधून मनोरंजनाबरोबरच व्यायाम व कसरत होते. (बैठ्या खेळातून बौद्धिक विकास होतो.) खिलाडीवृत्ती वाढते. संघभावना वाढते. मैत्री बळकट होते. एकाग्रता वाढते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आनंद मिळतो.
Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध
आता आयपीएलचा म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगचा जमाना आला आहे. देशातील श्रीमंत व्यक्ती नामवंत खेळाडूंच्या टीम विकत घेऊन त्यांच्यात सामने खेळवले जातात. अशा सामन्यांची जाहिरातही खूप केली जाते. चुरशीचे आणि रंगतदार सामने प्रेक्षक मनापासून पाहतात आणि खेळाचा आनंद लुटतात.
Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध
आता आयपीएलचा म्हणजे इंडियन प्रीमिअर लीगचा जमाना आला आहे. देशातील श्रीमंत व्यक्ती नामवंत खेळाडूंच्या टीम विकत घेऊन त्यांच्यात सामने खेळवले जातात. अशा सामन्यांची जाहिरातही खूप केली जाते. चुरशीचे आणि रंगतदार सामने प्रेक्षक मनापासून पाहतात आणि खेळाचा आनंद लुटतात.
COMMENTS