Friday, 6 September 2019

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध - Rastyache Manogat Essay in Marathi

Rastyache Manogat Essay in Marathi : Today, we are providing रस्त्याचे मनोगत मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Rastyache Manogat Essay (Nibandh) in Marathi Language to complete their homework.

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध - Rastyache Manogat Essay in Marathi

किती हे खाचखळगे आहेत ! सगळा रस्ताच खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्याने यायलाच नको होते, असे वाटसरूचे वाक्य कानी पडले आणि मित्रांनो मला अतीव दुःख झाले. आज माझ्या अंगावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढते आहे; पण तुम्ही सर्वजण या घटनांसाठी मलाच जबाबदार ठरवता, तेव्हा मला फार वाईट वाटते. खरेच, या सर्व गैर व्यवस्थेला मीच जबाबदार आहे का? Read also : वीज नसती तर मराठी निबंध

खरे पाहता, मानवाच्या जीवनाच्या प्रारंभापासून मी तुमची साथ-सोबत करीत आहे. गुहेत राहणाऱ्या आदिमानवाने जेव्हा पाऊल टाकायला सुरुवात केली, तेव्हा माझा जन्म झाला. जसजसा मानवाचा विकास होत गेला आणि तो अधिकाधिक चालू लागला तसतसा मी वाढत गेलो. मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचा आणि त्याच्या संस्कृतीच्या विकासाचा मी साक्षीदार आहे.

मानवाच्या प्रारंभीच्या जीवनाप्रमाणे मी सुरुवातीला ओबडधोबडच होतो. माझ्या जीवनालाही आखीव रेखीवता नव्हती. माझे जीवन काट्याकुट्यांनी भरलेले होते. अडखळत, ठोकर खात मानवाला वाटचाल करावी लागत होती. प्रवास करताना जंगलातून जावे लागे, तेव्हा माणूस भरकटून जंगली श्वापदांची शिकार होतो की काय, याची मला काळजी वाटत असे. आपल्या इच्छित स्थळी पोहचल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आनंद होत असे. कारण मी त्याच्या वाटेचा सोबती असतो. Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे

माणसाच्या जीवनात प्रगती, सुधारणा होत गेल्या, तशाच सुधारणा माझ्यात केल्या गेल्या. आता मी जसा लांबलचक, ऐसपैस, रुंद, गुळगुळीत दिसतो तसा मी आधी नव्हतो. साधी पाऊलवाट हे माझे प्रारंभीचे रूप. मानवाने आपल्या प्रवास साधनात जसजसे बदल करत सुखकारक प्रवासाचे मार्ग शोधले, तसतसे मला थोडे रुंद करण्यात आले. मोटारगाडी, मालवाहतूकीचे प्रमाण वाढताच माझ्या अंगावरचे छोटे-मोठे दगड दूर सारून, खाचखळगे बुजवून सुरुवातीस कच्च्या रस्त्याच्या अवस्थेत मी तुमच्या सेवेला हजर झालो. या काळात धुळीचे साम्राज्य फार होते. नंतर मात्र दळणवळणाच्या सोयीकडे लक्ष देण्यात आले. कमीत कमी वेळात नाशवंत पदार्थ भाज्या, फळे बाजारापर्यंत पोहचवणे गरजेचे वाटू लागले. वैदयकिय सेवांची मदत तातडीने पोहचणे गरजेचे वाटू लागले, तेव्हा मी डांबरी रस्त्याचे रूप घेऊन पुन्हा एकदा नव्या रूपात तुमच्या सेवेत रुजू झालो. झपाट्याने होणाऱ्या औदयोगिकीकरणाने माझ्या रूपात आणखी बदल झाले. मी एकपदरी, दुपदरी, चौपदरी, महामार्ग या स्वरुपांत बदलत जाऊन आज तर ‘एक्सप्रेस हायवे' या अत्यंत दिमाखदार रूपात तुमच्या सेवेत आहे. Read also : नदी बोलू लागली तर मराठी निबंध

मात्र, असे असले तरी डोंगरातून, दऱ्याखोऱ्यांतून फिरत आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास धुंडाळणाऱ्या गिर्यप्रेमींना, इतिहास प्रेमींना, तसेच नवे प्रांत, नव्या वाटा शोधणाऱ्या धाडसी प्रवाशांनाही मी तितक्याच आनंदाने साथ-सोबत केली आहे. म्हणूनच मानवाच्या संस्कृतीचा इतिहास लिहिताना मानवाच्या प्रगतीतील माझी ही साथ-संगत माणूस विसरला तर नवलच !

This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: