MULYA SHIKSHAN ESSAY IN MARATHI : In this article " मूल्य शिक्षण म्हणजे काय मराठी निबंध ", " Mulya Shikshan Mhanje Kay in Mar...
MULYA SHIKSHAN ESSAY IN MARATHI: In this article "मूल्य शिक्षण म्हणजे काय मराठी निबंध", "Mulya Shikshan Mhanje Kay in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "MULYA SHIKSHAN", "मूल्य शिक्षण म्हणजे काय मराठी निबंध", "Mulya Shikshan Mhanje Kay in Marathi" for Students
मूल्यशिक्षण म्हणजे काय? लहानपणापासून आपले पालक (आई, वडील, आजी, आजोबा, काका, मामा, इ.), घरातील मोठे आपल्याला सतत काही ना काही सूचना करत असतात. उदा. असे वाग, असे करू नये, मोठ्यांना उलट उत्तरे देऊ नयेत, रांगेने चालावे, गडबड करू नका, सकाळी लवकर उठा, मित्रमैत्रिणींशी भांडू नका इ.
पण ते फक्त सूचना करून थांबत नाहीत, तर आपल्याला तसे वागायला लावण्याचाही प्रयत्न करतात. यालाच 'मूल्य' म्हणजे नैतिक शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो तो! मूल्यशिक्षणाला 'संस्कार' असेही म्हणतात..
शाळेमध्ये पुस्तकातील पहिल्या पानावर असणारी प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो. ती प्रतिज्ञा मूल्यशिक्षण देणारं एक उत्तम उदाहरण आहे.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्याचं सर्वांनी कौतुक करावं, त्यानं नाव कमवावं. जगातील सर्व सुखे त्याला प्राप्त व्हावीत, त्याला आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, त्याला दुःख होऊ नये आणि समजा अडचण आलीच तर त्याचा धैर्याने सामना करता यावा असं वाटत असतं. अपयशही पचवता यायला हवं. थोडक्यात काय तर, आपला पाल्य सर्वगुणसंपन्न व्हावा, असं त्यांना वाटतं.
समाजामध्ये व्यक्ती म्हणून वावरत असताना अनेक घटकांचा आपल्यावर परिणाम होत असतो. जसं की, आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, शेजारी, शाळेतील शिक्षक, आपल्याला बातम्या देणारी दृक-श्राव्य साधने, आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना इ.
प्रत्येक क्षणाला आपले मूल्यशिक्षण चालू असते. जेव्हा काही मूल्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो, त्याचा विसर पडत नाही तेव्हा त्या परिणामाला 'संस्कार' म्हणतात.
मूल्य कृतीतून व्यक्त व्हावे लागते तसेच ते सातत्याने व्यक्त व्हावे लागते. उदा. आपण एक दोनदा प्रामाणिकपणे वागलो आणि इतर वेळी अप्रामाणिक वागलो, तर आपल्यावर कोण विश्वास ठेवेल? खरे बोलणारा एकदा जरी खोटे बोलला तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
लहानपणी कुटुंबातून होणारे संस्कार अतिशय महत्वाचे असतात. लहान मूल हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याला जसा 'आकार' देऊ तसे ते 'आकार' घेते. लहान मूल मोठ्यांचे अनुकरण करत असते. घरातील व्यक्ती एकमेकांशी कशा वागतात, कशा बोलतात या गोष्टी मुले त्यांच्या नकळत शिकत असतात. त्याचाच परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. मूल जन्मापासून कुटुंबाच्या सावलीत असते म्हणून कुटुंबातून सुरू होणारे संस्कार घेऊनच ते शाळेत प्रवेश करते.
शाळेतील त्याचे विश्व आता व्यापक होते. अत्यंत संवेदनक्षम व संस्कारक्षम वयात मूल शाळेत असते. शिक्षकांचे बोलणे, वागणे, विचार करणे असे विविधांगी मार्गदर्शन त्याला मिळून त्याच्यावर खोलवर परणाम होतो. सोबतच त्याचे सवंगडी, त्यांचे स्वभाव, वागणे तो पाहत असतो. शाळेत विविध थरांतील, जातिधर्मातील, प्रदेशातील, विविध भाषा बोलणारे विदयार्थी त्याला भेटतात. त्यांच्या चांगल्या-वाईट वागण्याचा परिणामही त्याच्यावर होत असतो.
शाळेत शिकवल्या जाणाचा विषयांतूनही तो घडतो. मराठीचे शिक्षक आपल्या प्रभावी शिक्षणातून त्याला साहित्यची गोडी लावू शकतात. पुढे भविष्यात तो उत्तम लेखक किंवा कवी होऊ शकतो. विज्ञान, भूगोल यासारख्या विषयांतून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. अशाप्रकारे प्रत्येक विषयाच्या अभ्यासामुळे जीवन जगण्याचे कोणते ना कोणते कौशल्य त्याला प्राप्त होते. आयुष्यातील, शाळेतील दहा वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत; कारण ते आपल्या यशस्वी जीवनाचे इहा खांब आहेत, त्यावरच आपल्या भविष्याची इमारत भक्कमपणे उभी राहते.
COMMENTS