Mobile che fayde va tote Essay in marathi Language : Today, we are providing मोबाइल चे फायदे व तोटे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, ...
Mobile che fayde va tote Essay in marathi Language: Today, we are providing मोबाइल चे फायदे व तोटे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mobile che fayde va tote Essay in marathi Language to complete their homework.
मोबाइल चे फायदे व तोटे मराठी निबंध Mobile che fayde va tote Essay in marathi Language
'भ्रमणध्वनी' ही काळाची गरज आहे, हे अगदी खरं आहे; कारण त्याचे फायदेही अनेक आहेत. भ्रमणध्वनीचा शोध हा विज्ञानाचा चमत्कारच मानावा लागेल.
आज आपण अगदी प्रत्येकाच्या हातात 'मोबाइल' पाहतो. एक हजार रुपायांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे मोबाइल, विविध कंपन्या आकर्षक पद्धतीने दुकानात विक्रीसाठी मांडून ठेवतात.
Read also : भ्रमणध्वनी / मोबाइल : शाप की वरदान मराठी माहिती
Read also : भ्रमणध्वनी / मोबाइल : शाप की वरदान मराठी माहिती
त्या छोट्याशा खिशामध्ये बसणाऱ्या यंत्रातील बटणे दाबली की हव्या त्या व्यक्तीशी हवं तेव्हा, हवा तेवढा वेळ, अगदी परदेशातही क्षणार्धात बोलू शकतो, संवाद साधू शकतो.
आपली कितीतरी कामे आपण फोनवरून (मोबाइल) करू शकतो. उदा. महत्त्वाचा निरोप देणे, डॉक्टरांशी संवाद साधणे, महत्त्वाच्या गुप्त गोष्टीही आपण त्याद्वारे कळवू शकतो. मोबाइलमुळे कामेही झटपट होतात. प्रवासाचा वेळ वाचतो, श्रम वाचतात. त्यामानाने खर्चही कमी येऊन पैशांची बचत होते.
मोबाइल यंत्र सोपे, सुटसुटीत असल्याने लहानांपासून थोरांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सर्वांना सहजपणे हाताळता येते.
Read also : सुसंगती सदा घडो मराठी निबंध
Read also : सुसंगती सदा घडो मराठी निबंध
मोबाइल हे संपर्काचे सुलभ साधन आहे. मोबाईलमध्ये फोटो काढता येतात, गेम्स खेळता येतात, चित्रे पाहता येतात, गाणी ऐकता येतात, एवढेच नाही तर 'इंटरनेट'ही सुरू करता येते.
इतके सगळे फायदे असले तरी मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे घरातील व्यक्तींचा आपाआपसातील संवाद कमी झाला एवढं मात्र खरं! आधीच तो दूरदर्शनवरील कार्यक्रमांमुळे कमी झाला होता. शाळांमध्ये शिकणारी लहानलहान मुले ही मोबाइलच्या आहारी गेलेली दिसतात. शाळा, कॉलेजमधील मुले तासांमध्येही त्याचा गैरवापर करतात. कॉपी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. मोबाइलमुळे मुलांच्या आत्मकेंद्री वृत्तीत वाढ झाली आहे.
जिकडे पहावे तिकडे सर्वत्र लोक वेळ मिळाला की, मोबाइलशी खेळताना दिसतात; मोबाइलमध्येच मग्न होतात. बसमध्ये, रेल्वेमध्ये, रस्त्यावर कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यक्तिगत बाबींबद्दल चर्चा करताना, वाद घालताना दिसतात.
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
मोबाइलमुळे पैशांचा आणि वेळेचा अपव्यय होतो. कार्यालयात, कामाच्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीपासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाजवळ मोबाईल असतो. त्यामुळे मोबाइलचा अनिर्बंध वापर होतो. काम करताना कामात एकाग्रता राहत नाही.
मोबाइलच्या अनिर्बंध वापरावर आता सरकारनेच बंदी घालायला हवी; कारण मोबाइलमधून निघणाऱ्या ध्वनीच्या चुंबकीय लहरी कानास इजा पोहोचवू शकतात, शिवाय मान वाकडी करून कानाला मोबाईल लावून दुचाकी वाहने चालविणारे महाभाग अपघाताला निमंत्रण देत असतात. त्यांच्यामुळे इतरांचे जीवही धोक्यात येतात.
आपले आरोग्य चांगले राहावे, आयुष्य व्यवस्थित जावे, आपण हाती-पायी धड राहावे असे वाटत असेल तर मोबाइलचे वेड़ कमी केलेच पाहिजे.
COMMENTS