Sunday, 16 February 2020

शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mashiti and Nibandh

Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mahiti and Nibandh : Today, we are providing शिवाजी महाराज मराठी निबंध, माहिती, भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mahiti and Nibandh to complete their homework. 

शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mashiti and Nibandh

"प्रपन्ननाम परित्राता।
प्रजानाम तु प्रियकर :।।"
प्रजेच्या संकटाचाच परिहार करणारा आणि प्रजेमध्ये अत्यंत प्रिय असलेला असा राजा.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर शिवाजीराजे जन्माला आले. तीन-साडेतीन शतकानंतरही ज्यांचे नाव घेतले असता समाजात नवचैतन्य निर्माण होते, ते शिवाजी महाराज महाराष्ट्रीय लोकांचे दैवत.
Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
समर्थ रामदास शिवाजी महाराजांबद्दल लिहितात -
"शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।
शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे ।
शिवरायांचे सलगी देणे । कैसी असे ।"
शिवरायांना लोकाभिमुख राजा म्हणता येईल. लोकशिक्षण हा शिवरायांच्या कर्तृत्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. या लोकशिक्षणाच्या जोरावरच शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.
शिवराय स्वतः ध्येयनिष्ठा, योजकता, अष्टावधानी, धर्माभिमानी, अष्टपैलू, कुशल सेनानी, युद्धतज्ज्ञ, प्रजादक्ष, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारे, असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले, वडीलधारे व साधुसंतांविषयी आदर बाळगणारे, स्त्रीदाक्षिण्य असणारे, उद्योगशील जाणता राजा होते. आदर्श राजाची सर्व गुणवैशिष्ट्ये त्यांच्या ठायी होती.
Read also : राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध
शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य आधार म्हणजे त्यांनी कोळी, मावळे, रामोशी, मराठे, ब्राह्मण, प्रभू, भंडारी या सर्व हिंदूबरोबरच इतर धर्मीय जसे मुस्लिम, ख्रिश्चन, सर्वांनाच बरोबरीने घेतले. शिवाजी महाराजांनी मुसलमानांनाही औदार्याने वागविले.
त्यांचा सर्वधर्म सहिष्णुता हा विचार निव्वळ प्रचारासाठी विचार नव्हता. सर्वच मंदिरे, मशिदी, दर्गे यांची दिवाबत्ती, पूजाअर्चा यांची व्यवस्था त्यांच्या खजिन्यातून रोख रूपाने होई.
जवळजवळ १४ साधुसंतांना आपले गुरू मानून ते आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कृपाप्रसादाला देत असत.
दयाळूपणा आणि लोककल्याणी वृत्ती यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली.
शिवाजी महाराजांची योग्यता स्वयंसिद्ध आहे. डौलदार आणि वैभवसंपन्न अशी त्यांची राहणी होती.
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्म परायणतेचे व परधर्म सहिष्णुतेचे होते.
६ जून, १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी सुवर्णतुला होऊन गरिबांना सुवर्ण होन वाटण्यात आले.
रयतेची काळजी घेणारे, रयतेवर जिवापाड प्रेम करणारे, एक शिस्तप्रिय, कर्तव्य कठोर असे महाराजांचे वर्णन करता येईल. रयतेची काळजी घेताना ते भावुक होतात. “आपल्या राज्यात जर जनता उपाशी राहिली, तिच्यावर अन्याय, जुलूम झाला तर आपण मोगल मुलकात आलो, असे लोक म्हणतील."
वृक्षसंवर्धनाबाबतही महाराज जागरूक होते. आपल्या एका आज्ञापत्रात ते लिहितात, "झाडे तोडताना विचार व्हावा, रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिली यावरी त्यांचे दुःखास पारावार काय?"
Read also : मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
शेतीचा धंदा ही फक्त त्या-त्या रयतेची जबाबदारी नसून शेतीचे उत्पन्न वाढविल्याने व पडीक जमीन लागवडीखाली आणल्याने सर्व राज्याची भरभराट होते; हा दूरवरचा विचार अमलात आणत शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत देण्यासंबंधी सरकारी अधिकाऱ्यांना ते सूचना देत.
शिवाजी महाराज धार्मिक होते; पण धर्मभोळे नव्हते. कठोर होते; पण क्रूर नव्हते. साहसी होते; पण आततायी नव्हते. व्यवहारी होते; पण ध्येयशन्य नव्हते.
अशा जाणत्या राजाने राजमुद्रेतून 'शहाजीचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे,' अशी लोकांना ग्वाही दिली आहे.
Read also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
३ एप्रिल, १६८० मध्ये महाराजांना देवाज्ञा झाली. समर्थ रामदासांनी अत्यंत समर्पक शब्दात महाराजांचे केलेले हे वर्णन;
"निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी
यशवन्त, कीर्तिवन्त । सामर्थ्यवन्त, वरदवन्त
पुण्यवन्त, नीतिवन्त । जाणता राजा ।।"

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: