Saturday, 14 September 2019

परीक्षेतील प्रदूषण निबंध मराठी - Essay on Examination System in Marathi

Essay on Examination System in Marathi : Today, we are providing परीक्षेतील प्रदूषण निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Examination System Essay / Nibandh Marathi Madhe to complete their homework.

परीक्षेतील प्रदूषण निबंध मराठी - Essay on Examination System in Marathi


परिसरातील अहितकारक बदलांना प्रदूषण असे म्हणतात. अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात अहितकारक बाबींचा प्रवेश झालेला दिसतो. हे एक शैक्षणिक क्षेत्रातील प्रदूषणच होय. हे प्रदूषण परीक्षेपर्यंत पोहचलेले दिसून येते.

अभ्यासलेल्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनात परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणतीही परीक्षा सुरू होत आहे असे ऐकल्यावर मनाला धसकाच बसतो. एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. कित्येक विद्यार्थ्यांना या तणावातूनच जावे लागते. या तणावग्रस्त परिस्थितीतील अनेक घटना घडतांना दिसून येतात. मना सज्जना लाज थोडी धरावी। Read also : पाऊस निबंध मराठी

परीक्षेमध्ये कॉपी तू न करावी।। परीक्षेतील या प्रदूषणाचे प्रदूषक घटक म्हणजे कॉपी करणे होय. कॉपी करून पास होता येते या विषयीचा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये वरचे वर वाढत चालला आहे. 'अभ्यासास सुट्टी कॉपीस गट्टी' असे चित्र पहावयास मिळते. परीक्षेत प्रदूषण करणारे कोण ? कसले ? या विषयीचा भूतकाळ पाहिला तर लक्षात येईल की, हे विद्यार्थी १०वी १२वी व इतर सर्व परीक्षांमध्ये आल्यावर कॉपी करतात असे नाही; तर अगदी पहिल्या इयत्तेपासूनच त्यांना ही सवय लागलेली असते, ही मुले जसजशी मोठी होतात वरच्या वर्गात जातात तसतसा त्यांचा कॉपी करण्याचा आत्मविश्वास वाढत जातो. कोणतेही कष्ट न करता परीक्षेत पास होता येते, हे त्यांनी ओळखलेले असते. हे प्रदूषण येथेच थांबत नाही तर अनेक घटक या प्रदूषणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतात. Read also : साक्षर भारत समर्थ भारत निबंध मराठी

आपल्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तायादीत यावे म्हणून वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यास मदत करणारे शिक्षक यांना पर्यवेक्षक म्हणून नेमणे, उत्तरे फळ्यावर लिहून देणे, उत्तरे सांगणे, पेपर लिहून देणे असे प्रकार सर्रास चालतांना दिसतात. हे प्रदूषणच आहे. आपल्या विषयाचा निकाल चांगला लागावा, अशी शिक्षकांची इच्छा असते. निकाल कमी लागला तर समाजाचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो याची चिंता, संस्थाचालकांचा रोष, शासकीय चौकशी, पगार कमी होणे किंवा पगार बंद होणे, इ. प्रश्न 'आ' वासून समोर उभे असतातच. संस्थाचालक आपल्या शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तरे फळ्यावर लिहून देणे, उत्तरे पुरविणे यासाठी शाळेतील सेवक, परीक्षेच्या वेळी असणारे पोलीस, पाणी पुरविणारे विद्यार्थी यांच्या सहकार्याने मदत करतात. एकमेकां साहाय्य करून जास्तीजास्त चांगला निकाल कसा लागेल यासाठीचे प्रयत्न म्हणजे परीक्षेतील प्रदूषणच दिसते. काही शाळा आपल्या विद्यार्थ्यांचे पेपर कोठे तपासायला गेले याचा तपास काढून पर्यवेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांना पैशांचे आमिष दाखवून जास्तीतजास्त विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचे प्रयत्न करताना दिसतात.

या सर्व गोष्टींमध्ये पालकांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून येतो. आपल्या मुलाला चांगले गुण मिळावेत यासाठी पालक त्यांच्यावर आपल्या महत्त्वाकांक्षा लादतात. त्यापायी मग आपल्या पाल्याला मदत करण्याचा प्रयत्न पालक करताना दिसतात. परीक्षेच्या वेळी कॉपी पुरविणे, त्याच्या ऐवजी डमी मुलगा बसविणे, लाच देणे यासारखे प्रकारही घडतात. शासकीय स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटणे, त्यातून पैसा कमावणे हे सुद्धा परीक्षेत घडणारे प्रदूषणच आहे. Read also : महाराष्ट्राची संस्कृती मराठी निबंध

अशा प्रकारच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करताना दिसते. उदा. १०वी व १२वी च्या परीक्षेतील प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी नवनवीन उपाय योजना अमलात आणल्या जातात. त्यासाठी भरारी पथक नेमणे, ज्या ठिकाणी कॉपी होते अशा ठिकाणी व्हिडीओ चित्रीकरण, पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांची अदलाबदल, तोतयेगिरी टाळावी म्हणून प्रवेश पत्र व आवेदन पत्रावर परीक्षार्थीचा फोटो स्कॅन करणे तसेच उत्तरपत्रिकेची ओळख पटू नये यासाठी बारकोड, होलोक्राप्ट स्टिकर्स चिकटवणे अशा पद्धती अमलात आणल्या जात आहेत. गणित, इंग्रजी या विषयांच्या बहुसंच सराव प्रश्नपत्रिका योजना अंमलात आणणे असे प्रयत्न केले जात आहेत. पण हे प्रदूषण इतके खोलवर रुजलेले आहे की, कोणत्याही प्रयत्नाने परीक्षेतील हे प्रदूषण समूळ नष्ट करणे कठीण आहे. त्यासाठी आधी अधिक मार्काचा हव्यास बंद व्हायला हवा. परीक्षेत जास्त मार्क्स म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण ही मानसिकता बदलायला हवी. पास झाले, पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला किंवा पदवी मिळाली म्हणजे बस, मग ती कुठल्याही मार्गाने मिळो हा विचार सर्वांनीच सोडून द्यायला हवा. नाहीतर शासनाने/शिक्षण मंडळाने कितीही कायदे केले वा प्रयत्न केले तरी परीक्षेमधील हे प्रदूषण थांबणार नाही. Read also : पंढरीची वारी मराठी निबंध


This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: