Samaj Sudharak Baba Amte Essay in Marathi : In this article मानवतेचे पुजारी बाबा आमटे निबंध मराठी , " माझा आवडता समाजसेवक निबंध ",...
Marathi Essay on "Samaj Sudharak Baba Amte", "मानवतेचे पुजारी बाबा आमटे निबंध मराठी", "माझा आवडता समाजसेवक निबंध" for Students
नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी !
संत गाडगे बाबा, महात्मा जोतिबा फुले यांच्याच पंक्तीतील उदाहरणं म्हणजे बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, अभय बंग, राणी बंग आणि रवींद्र कोल्हे.
प्रत्येकाचं कार्य प्रेरणादायी - समाजाला सशक्त करण्याचं, दिशा देण्याचं, माणुसकी जागृत करण्याचं, एकमेकांना समजून घ्या असा संदेश देणारं! समाजभान आणणारं...
समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं मिळावं म्हणून बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं. दृष्टी दिली आणि संधीही!
आनंदवनात 'श्रमसंस्कार छावणी' आयोजित केली जाते. बाबांच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाही. सुखवस्तू मालगुजर घराण्यात जन्मलेल्या, उच्चशिक्षित (वकील) असूनही सुखासीन आयुष्याकडे पाठ फिरवत बाबांनी खडतर मार्ग निवडला.
असह्य वेदनांनी कण्हत असलेला, नासलेला, बोटं झडलेला तुळशीराम पाहिला अन् बाबांनी आपल्या सुखासीन आयुष्याला रामराम ठोकला. पतीनं घेतलेल्या या व्रतासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारी पतिव्रता, साध्वी होत्या त्यांच्या पत्नी - साधनाताई.
सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणलं बाबांनी! समाजानं धूत्कारलेल्या, झिडकारलेल्यांना बाबांनी कष्टाची भाकरी खायला शिकवलं. कुष्ठरोग या भयानक रोगावर उपाय शोधण्यासाठी बाबा कोलकात्याला गेले. कुष्ठरोगाचे जंतू स्वतःला टोचून घेतले.
बाबा आमटे या पाच अक्षरांमध्ये पंचप्राणांचं सामर्थ्य आहे.
आनंदवनात आज कुष्ठरोग्यांनी बनविलेल्या चादरी, टॉवेल, कापडी वस्तू, चामड्याच्या शिलाई व खिळे नसलेल्या चप्पल, फॅन्सी बॅग, पर्स, पेंटिंग, ग्रीटिंग अशा अनेक वस्तू तयार होतात. मानानं जगण्याचं कौशल्य बाबांनी त्यांना दिलं. म्हणून म्हणतो की,
"दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती"
बा. भ. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे 'देखणी ती जीवने' अर्थात बाह्य सौंदयपिक्षा आंतरिक सौंदर्याला मानवीजीवनात अधिक महत्त्व देणारे असे बाबा आमटे.
समाजकार्याचं व्रत घेतलेल्या थोर विभूती या जगातून गेल्या असल्या तरी त्यांच्या कार्यानं ते निश्चितच अजरामर राहतात.
"देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती...
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपर्दो रेखिती।"
आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्प.
अंध-अपंग, समाजानं नाकारलेल्या महारोग्याचं वैभवशाली प्रख्यात गाव वसवण्याचं पुण्याचं काम महान समाजसेवक बाबा आमटेंनी केलं. इथं विविधांगी उद्योग, प्रगतिशील शेती, फुलाफळांचे बागबगीचे, निर्माण केलेल्या शाळा-कॉलेजेस्, नवनवे कलात्मक सर्जन, इथली शिस्त, वक्तशीरपणा, शांती, क्रांती, मानवता आणि विकास व प्रकाश हे सारं इथं पहायला मिळतं.
आनंदवनात तीन पिढ्यांचा इतिहास आहे. बाबा आमटे व साधनाताई आमटे, दुसरी पिढी डॉ. विकास आमटे व डॉ. भारतीताई, तसेच डॉ. प्रकाश आमटे व सौ. डॉ. मंदा आमटे आणि तिसरी पिढी डॉ. कौस्तुभ - शीतल आमटे, दिगंत आमटे.
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प प्रेरणादायी आहे. बाबा आमटेंचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली आणि मृत्यू ९ फेब्रुवारी २००८ साली (वयाच्या ९३ व्या वर्षी) आनंदवन इथं झाला.
पद्मश्री १९७१ रॅमन मॅगसेसे अवॉर्ड १९८५, पद्मविभूषण १९८६ हे आणि असे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानाने विभूषित. अशा अचाट आणि अफाट कार्य करणाऱ्या बाबा आमटेंना माझा सलाम!
Very best samaj sudarakh speech in Marathi
ReplyDelete