Wednesday, 11 September 2019

पंढरीची वारी मराठी निबंध - Pandharichi Vari Essay in Marathi

Pandharichi Vari Essay in Marathi Language : Today, we are providing पंढरीची वारी मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Pandharichi Vari Essay in Marathi Language to complete their homework.

पंढरीची वारी मराठी निबंध - Pandharichi Vari Essay in Marathi

"ग्यानबा तुकाराम" असा घोष करत टाळांच्या तालावर नाचत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी पालखीबरोबर पंढरीची वाट धरली होती. आजूबाजूचे जग, नातेवाईक आपली सुख-दुःख, आपलं सारं... सारं काही विसरून विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गक्रमण करत होती. तहान भूक, शारीरिक पीडा ह्या साऱ्यांचा त्यांना विसर पडला होता. विठूमाऊलींचं दर्शन हाच एक ध्यास त्यांच्या मनात होता. Read also : मी केलेली सहल

पूर्वी समाजात खूपच अस्थिरता होती. परकीयांच्या अत्याचारामुळे समाज गांजला होता. असुरक्षित होता. अशा वेळी समाजाला स्थिर करणं, त्यांना होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणं, आपली सुरक्षितता ही समाज संघटित करण्यात आहे हे प्रबोधन करणं हे संतांनी ओळखलं. म्हणूनच समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र यावं, विषमता निर्मूलन करणं ह्या उद्देशानं विठूमाऊलीचं अधिष्ठान देऊन संतांनी पंढरीची वारी सुरू केली.

आषाढी एकादशीच्या आधी वारकऱ्यांची दिंडी देहू, आळंदीहून निघते आणि पंढरपुरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागते. हजारो वारकरी वर्षानुवर्ष पंढरीची वारी करतात. संत ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या साथीने भक्तीरसात न्हाऊन निघालेला वारकऱ्यांचा महापूर विठोबा रखुमाईच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरीला जातो. सर्व समाजातील लोक भान विसरून एकरूप होऊन शिस्तबद्धपणे पंढरीला जातात. Read also : आमची सहल निबंध मराठी

सर्व वातावरण शुद्ध सात्त्विक असतं. टाळांचा गजर, गोड गळ्यांनी गायलेली भजनं, हरिनामाचा गजर करून तालात नाचणारी पावलं... भक्तीरसाचा अलौकिक आविष्कार ह्या वारीत आढळून येतो. वारीतल्या वारकऱ्यांवर ह्या वातावरणाचा इतका परिणाम होतो की त्यांचे मन उचंबळून येते. पंढरीची वाट चालताना पावलं दुखली का? थकली का? कशाचीही वारकऱ्यांना तमा नसते. असते ते केवळ आत्मिक समाधान... असीम भक्ती...Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी

पताका खांद्यावर घेऊन वारकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन स्त्रिया, मुखाने ज्ञानदेव तुकाराम यांचा गजर करत हजारो वारकरी अगदी भान हरपून विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने जातात. आपल्या सारख्या सामान्य जनांना भक्तीरसाचे दर्शन घडते आणि सामाजिक एकात्मतेचे अभूतपूर्व दर्शनही घडते.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: