Wednesday, 14 August 2019

थांबला तो संपला मराठी निबंध - Thambla to Sampla Nibandh Marathi

Today, we are publishing थांबला तो संपला मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Thambla to Sampla Nibandh Marathi) in completing their homework and in competition.

थांबला तो संपला मराठी निबंध - Thambla to Sampla Nibandh Marathi

"झुळझुळ वाहतो झरा तो रानी 
खळखळ-खळखळ नदीचे पाणी
ध्येय गाठण्या नित्य जीवनी
मार्ग रोधण्या समर्थ ना कोणी।" 
पाण्याचा प्रवाह कधी थांबत नाही. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडून, वळसा घालून ते नित्य पुढेच जात असते. मानवीजीवन पाण्याप्रमाणेच प्रवाही असावे. पाणी पुढे न जाता साचून राहिले तर त्याचे डबके होते. कालांतराने त्यात किडे पडतात. पाण्याला दुर्गंधी येते, त्याचा कोणालाच उपयोग होत नाही. परंतु जे पाणी सतत वाहते ते नदीला,नंतर समुद्राला जाऊन मिळते. सागरमय होऊन जाते. त्या क्षुद्र प्रवाहाला दिव्यत्व प्राप्त होते. पावन तीर्थाचे भाग्य लाभते.

गतिशीलता हेच जीवनाचे खरे लक्षण आहे. गतीमुळे जीवनात प्रगती होते, चैतन्य निर्माण होते. आळसे कार्यभाग नासला' असे रामदासांनी म्हटले आहे. जो जीवनातील संकटांना घाबरून प्रयत्न करण्याचे सोडून देतो त्याला जीवनात यश कधीच मिळत नाही. तो आपल्या उच्चाकांक्षा प्रत कधीच जाऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात -
'थांबला तो संपला' येथे संपणे म्हणजे मरणे असा अर्थ होत नाही. संपणे म्हणजे विनाशाकडे जाणे, प्रगतीला पारखे होणे. डबक्यातल्या पाण्याप्रमाणे सडत आयुष्य जगणे, पशुसुद्धा मृत्यू येईपर्यंत जगत असतातच. त्यांच्या जीवनात प्रगती नाही.

मनुष्य मात्र सतत धडपडत असतो. नव-नवे शोध लावत असतो. जीवन सर्वांग सुंदर, सुखकर बनविण्यासाठी हजारो वर्षे तो प्रयत्न करत आहे. म्हणूनच पाषाण युगात गुहेत राहणारा मानव आज चंद्रावर पोहोचला आहे. विज्ञानाचे अनेक चमत्कार हे त्याच्या आजवरच्या प्रयत्नांचे फलित आहे.
जग अतिशय वेगाने पुढे चालले आहे. त्याच्या पावलाशी पाऊल मिळवित आपण चाललो नाही तर आपण कायमचे मागे राहू.
"आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुत: धनम्।" 
              "अधनस्य कु तो मित्रम्, अमित्रस्य कुतः सुखम्।" अथवा - 
“उद्यमेनहि सिध्यन्ति कार्यानि न मनोरथैः।" 
या दोन्ही सुभाषितांमध्ये प्रयत्नाचे महत्त्व वर्णिले आहे.
वर्षभर अभ्यास न करता केवळ गप्पा-गोष्टीत, मनोरंजनात व खेळण्यात वेळ घालविला तर परीक्षेत यश कसे मिळणार ? परीक्षा जवळ आल्यानंतर खूप अभ्यास करावा वाटला तरी वेळ पुरत नाही आणि मग पश्चात्ताप करण्याची पाळी येते. बाकीचे विद्यार्थी दरवर्षी चांगल्या मार्काने पास होतात, उच्च पदव्या मिळवितात, मोठ-मोठी पदे भूषवितात. पण आळशी मात्र १० वीत किंवा १२ वी तच अडकून राहतो. त्याची प्रगती थांबते, तो संपतो. गती नसते. होते ती जीवनाची गत.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: