एकेकाचे स्वभाव निबंध मराठी - Aikekache Swabhav Nibandh Marathi

Admin
0
Today, we are publishing एकेकाचे स्वभाव निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Aikekache Swabhav Nibandh Marathi) in completing their homework and in competition.

एकेकाचे स्वभाव निबंध मराठी - Aikekache Swabhav Nibandh Marathi

"पिण्डे-पिण्डे मतिर्भिन्न: कुण्डे-कुण्डे नवं पयः
जातो जातो नवाचारा: नवा वाणी मुखे-मुखे।" 
या नियमाप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकेच भिन्न-भिन्न स्वभाव, वेगवेगळ्या आवडी-निवडी, चित्र-विचित्र सवयी या असणारच. अगदी सख्खे चार भाऊ असले तरी प्रत्येकाच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.

स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माणसांचे सज्जन-दुर्जन, सुष्ट-दुष्ट, रागीट-शांत, दयाळू-क्रूर, उदारकंजूष, स्वार्थी-निस्वार्थी, कष्टाळू-आळशी, धाडसी-भित्रे व नम्र-उद्धट असे अनेक प्रकार पडतात.

एखाद्या माणसामध्ये एखाद्या गुणाचा अथवा दोषाचा अतिरेक झाला तर त्याची गणना विक्षिप्त अथवा लहरी माणसात केली जाते. 

एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या योग्यतेपेक्षा जास्त मानाचे, उच्च स्थान प्राप्त झाले तर त्याला त्या सत्तेचा उन्माद चढतो. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो मनुष्य तुच्छ समजू लागतो. समोरच्या माणसाचे ज्ञान, बुद्धी, वय, त्याचे विचार, समाजातील स्थान याचा विचार न करता पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. वादासाठी वाद घालण्यात आणि शेवटी आपलेच म्हणणे खरे करण्यात त्यांना धन्यता वाटते. उच्चासनावर बसणे म्हणजे इतरांच्यावर हुकूमत गाजविणे, जमेल तेवढा त्रास देणे, मुद्दाम गैरसोय करणे व स्वत:च्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास आकांड-तांडव करणे. त्यांच्या मते, सौजन्य आणि विनम्रता या गोष्टी वरिष्ठांसाठी नसतातच. समाजात असे मदांध सत्ताधारी काही कमी नसतात.

याउलट काही काही अतिशय उदारमतवादी, विद्वान व तरीही विनम्र असतात.

जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. काहीजण हा पैसा नको तेथे नको तेवढा उधळतात. तर काहीजण पैसा-पैसा जपून ठेवतात. अगदी मुलाबाळांपेक्षा किंवा स्वत:च्या जीवापेक्षाही पैशाला जास्त जपतात. प्रत्येक गोष्टीत नको इतकी काटकसर करतात. गाठीचा पैशाला खर्च जास्त नको म्हणून काही वधूपिते आपली कन्या एखाद्या बीजवराच्या किंवा व्यसनी माणसाच्याही गळ्यात बांधून रिकामे होतात. मुला-मुलींच्या एखाद्या गंभीर आजारातसुद्धाखाजगी दवाखान्यात न जाता १-२ रुपयात मिळणाऱ्या सरकारी दवाखान्यातील औषधावरच भागवितात.

तिरसट स्वभावाच्यामाणसांचे वागणे तर अगदीच विचित्र असते. एखादी गोष्ट वेळेत झाली नाही किंवा मनाविरुद्ध झाली तर ही माणसे जेवणाचे ताट भिरकावून देतील, कपडे फाडतील, घरातील काचेच्या वस्तू फोडतील किंवा बायकोला आणि मुलांना बेदम मार देतील. 

गौतम बुद्ध, पंडित नेहरू यासारखे काही शांतीचे दूत असतात तर काही हिटलरसारखे हुकुमशहा असतात. ख्रिस्तासारखे काही प्रेमळ स्वभावाचे असतात तर काही कंसासारखे क्रूर असतात. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, “माणसाच्या स्वभावाला औषध नसते' हेच खरे.

This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !