Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh : In this article read "माझा आवडता कवी रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध", "महाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती
Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh : In this article read "माझा आवडता कवी रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध", "महाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध", "Marathi Essay on Rabindranath Tagore" for Students.
महाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh
महाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - 'मानवता' ज्याच्या काव्याचा आत्मा आहे, असा विश्वकवी. त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहाला 1913 मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. स्वातंत्र्य म्हणजे उत्तरोत्तर ध्येयाकडे जाण्याचे साधन, हे गुरुदेवांनी भारतीयांना सांगितले. गुरुदेवांचे स्मरण करू या. 7 ऑगस्ट, 1941 रोजी ते देवाघरी गेले. 1913 मध्ये त्यांच्या गीतांजलीला नोबेल मिळाले. या विश्वकवीने जपान, अमेरिका इत्यादी देशात मग दौरा काढला. राष्ट्रवाद हा आक्रमक नसावा, जागतिक ऐक्याला तो अनुकूल असावा असा संदेश त्यांनी दिला.
रवीद्रांचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. विश्वभारती स्थापून त्यांनी पूर्व-पश्चिमेच्या ऐक्याचा समन्वयाचा भारताला नि जगाला वस्तुपाठ दिला. वंगभंगाच्या चळवळीच्या वेळेस त्यांची काव्यवीणा भारतभक्तीची गीते गाऊ लागली; परंतु त्यांच्या देशभक्तीला अत्याचार, द्वेष सहन होत नसे. "देशाने स्वावलंबी होऊन आपला संसार नीटनेटका करावा," ते म्हणाले. असहकाराच्या चळवळीच्या वेळेस त्यांनी 'सर' पदवी परत केली. कलकत्ता काँग्रेसच्या वेळेस 1917 मध्ये ते स्वागताध्यक्ष होते; परंतु राजकारण त्यांच्या धर्म नव्हता.
ते एका मुलाखतीत म्हणाले, "माझ्यासमोर मी तरुण असताना अनेक रस्ते होते; परंतु मी कवी आहे असे मला वाटले. तो माझा धर्म," पुण्याला एकदा व्याख्यानात ते म्हणाले, "कोपऱ्यात बसून गाणे माझा धर्म."
1941 मध्ये पंडितजी तुरुंगात असताना ब्रिटिश पार्लमेंटमधील एका बाईने दुष्ट टीका केली. रवींद्रनाथांनी मरणशय्येवरून तेजस्वी उत्तर दिले. ते म्हणाले, "भारताचा तो सपत्र तुरुंगात आहे. तो उत्तर देऊ शकत नाही. मी देतो." महात्मा गांधी आणि गुरुदेव यांचेही परस्परांवर किती प्रेम। रवींद्रनाथ हे महाकवी होते; परंतु ते म्हणतात, “मी काव्य लिहिले; परंतु ते कशासाठी? मानवता हा माझ्या काव्याचा आत्मा आहे." त्यांचे काव्य ध्येयहीन नव्हते.
त्यांची कला मानवतेच्या उपासनेसाठी होती. जवाहरलाल म्हणतात. "गुरुदेवांनी या राष्ट्राला क्षुद्रपणापासून वाचविले. जे जे पवित्र नि मंगल आहे त्यांची जाणीव दिली." असे हे थोर पुरुष, टीका झाली तरी, “एकला चलोरे" ते सांगतात. "जेथे क्षुद्रता नाही. संकुचित रूढी नाहीत. जेथे सर्वांची मान सरळ आहे, जेथे बुद्धी अखंड पुढे जात आहे. जेथे नवनवीन उद्योगांना हात घातला जात आहे. ध्येये अधिकाधिक विशाल होत आहेत. अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझा भारत जागृत होऊन नांदो."
स्वातंत्र्य म्हणजे उत्तरोत्तर विशाल ध्येयाकडे जाण्याचे साधन, असे गुरुदेव सांगत आहेत. तो संदेश स्मरून जाऊ या.
COMMENTS