माझा कप्पा मराठी निबंध : Today, we are providing माझा कप्पा निबंध मराठी मध्ये For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can U...
माझा कप्पा मराठी निबंध : Today, we are providing माझा कप्पा निबंध मराठी मध्ये For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Kappa Essay / Nibandh in Marathi Language to complete their homework.
माझा कप्पा निबंध मराठी मध्ये
दादा आणि मी एका खोलीत झोपतो. एकाच खोलीत अभ्यास करतो. एक टेबल आहे खोलीत दोन खुर्त्या आहेत. खोलीत एक कपाट माझे आहे व एक कपाट दादाचे आहे..
माझ्या कपाटाला तीन कप्पे आहेत. वरच्या कप्प्यांत मी माझे कपडे ठेवतो. गणवेश आणि इतर कपडे. आई सांगते कपडे छान घड्या करून ठेवावे पण मला येतो कंटाळा. मी कपडे कोंबून ठेवतो आणि मग दार .. उघडले म्हणजे सगळे कपडे माझ्या अंगावर पडतात. मग मी चिडतो, रडतो, रागावतो, आई रागावते. सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवते.
दुसरा कपाटाचा कप्पा म्हणजे माझ्या वह्या, पुस्तके, दप्तर कंपास पेटी. त्या कप्यांत काय काय आहे ह्याचा मलाच पत्ता लागत नाही. दाराला आतून टाईम टेबल चिकटवलेले आहे. दप्तर भरायला सोपे जाते. तरी रोज मी काहीतरी विसरतो आणि वर्गात बोलणी खातो. आई रागावते. “दादाचा कप्पा कसा निटनेटका आणि व्यवस्थित आहे तो बघ, आणि हो जरा शहाणा". असं सांगते. मला अजून काही कप्पा सुरेख ठेवायला जमत नाही. वह्यांची फाडलेली पाने बोळे करून मी कप्प्यातच ठेवतो. बाहेर दादानी पाहिले तर खा मार आईचा.
माझ्या कपाटाचा तिसरा कप्पा तुम्ही बघाल ना तर पळूनच जाल! खडूचे तुकडे, मोडक्या डब्या, जुने पेन, चॉकलेटच्या चांद्या, गोट्या, चेंडू, बाटल्या मोडके करकटक, रबर, सगळं सगळं कपाटांत असत.
कपाट व्यवस्थित स्वच्छ असावं असं आई बाबा सांगतात, दादा सांगतो, मला पण कळतं तरी माझा कप्पे असे कां असतात?
कंटाळा येणे ही फार वाईट गोष्ट आहे. मला कंटाळा का येतो? मी काय केले म्हणजे मी व्यवस्थित होईल.
व्यवस्थितपणा! वस्तू जागच्याजागी नीटनेटके ठेवणे, इस्त्रीचे कपडे नीट ठेवणे, कप्पा स्वच्छ ठेवणे, मला आवडते पण ठरवून सुद्धा परत मी तसाच वागतो. ह्या 'मदर्स डे' ला मी आईला वचन दिले आहे, की मी खूप व्यवस्थित वागणार म्हणून. तुम्हाला पण सांगतो तुमचा कप्पा व्यवस्थित नसेल तर तो ठेवा! काय!
This essay is provided to you by BookGanga.com - Please visit there website here in order to fine good Marathi books.
This essay is provided to you by BookGanga.com - Please visit there website here in order to fine good Marathi books.
COMMENTS