Monday, 9 September 2019

आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी - Rashtradhwaj Tiranga Essay in Marathi Language

Rashtradhwaj Tiranga Essay in Marathi Language : Today, we are providing आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Rashtradhwaj Tiranga Essay / Nibandh in Marathi Language to complete their homework.

  आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी - Rashtradhwaj Tiranga Essay in Marathi Language

  पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी घराघरावर, ऑफीसमध्ये शाळेत सर्वत्र राष्ट्रध्वज लावला जातो व ध्वजाला प्रणाम केला जातो. ध्वजाला वंदन करण्याचे हे तीन दिवस आपले राष्ट्रीय सण आहेत. पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारीला लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करावा, असे लेखी नक्की झाले, व १ मे कामगार दिन आहे. Read also : देशभक्ति निबंध लेख मराठी

  आपल्या झेंड्यात तीन रंग आहेत. सर्वात पहिला रंग केशरी, त्याग, शौर्य, पराक्रम हे केशरी रंग दाखवतो. शिवाजी महाराजांचा झेंडा पण केशरी भगवाच होता. मध्यभागी पांढरा रंग आहे. ह्या रंगाचा अर्थ शांतता, समानता, स्वच्छता असा घ्यायला हरकत नाही. सर्वांत खाली हिरवा रंग. निसर्गात हिरवा रंग जागोजागी दिसतो. जंगल, झाडे, फळे, फुले भाजीपाला ही निसर्गाची वेगवेगळी सुंदर रूपे. निसर्ग म्हणजे हिरवा रंग आणि हिरवा रंग म्हणजे समृद्धी, समृद्धी. थोडा अवघड शब्द आहे ना! समृद्धी म्हणजे श्रीमंती सर्व गोष्टी भरपूर असणे. समृद्धी असेल तरच समाधान असते.

  आपल्या ध्वजात पांढऱ्या रंगाचा जो पट्टा आहे त्यांत निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. त्या अशोक चक्राला २४ आरे आहेत. निळा रंग आभाळाचा आहे. मोठे आकाश, निळा रंग समुद्राचा आहे. मोठा समुद्र तसेच मोठे मन ठेवा. असे तर हा रंग शिकवत नसेल. Read also : राष्ट्रधर्म हाच खरा धर्म निबंध मराठी

  ध्वज उंचावर योग्य फडकवावा. ध्वजावर पाय पडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. ध्वजाचा बोळा करून टाकणे म्हणजे देशाचा अपमान करणे आहे. ध्वजाचा अपमान करू नये. ध्वज लावल्यानंतर त्याला वंदन करून राष्ट्रगीत चालू असेपर्यंत सावधान स्थितीत उभे रहावे व त्याचा मान राखावा.

  तिरंगा विषयी माहिती मराठी - Tiranga Vishe Mahiti Marathi Madhe

  भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली. Read also : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

  भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.

  ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
  1. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
  2. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
  3. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
  4. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

  SHARE THIS

  Author:

  I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

  0 comments: