देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजनदास मराठी निबंध - Essay on Chittaranjan Das in Marathi 5 नोव्हेंबर, 1870 ला चित्तरंजनांचा जन्म झाला. खानदान व कर्णासमान उदार
देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजनदास मराठी निबंध - Essay on Chittaranjan Das in Marathi
देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजनदास मराठी निबंध - "स्वातंत्र्य मिळवता मिळवता मी मेलो, तर या भमीत पन्हा काम करीन. माझ्या जीवनांतील सारी आशा, सारा उत्साह या ध्येयासाठी आहे. त्या ध्येयाची पूर्णता होईपर्यंत मी पुन्हा पुन्हा येथे जन्मेन नि धडपडेन." देशबंधूंचे जीवन म्हणजे स्फूर्तीचा अनंत ठेवा! विश्रांतीहीन कर्तव्य, असीम त्याग!!
5 नोव्हेंबर, 1870 ला चित्तरंजनांचा जन्म झाला. खानदान व कर्णासमान उदार घराण्यात, शिकले, बॅरिस्टर झाले; परंतु घरी गरिबी. वडिलांनी अनेकांना हजारो रुपये मदत म्हणून दिलेले पैसे कोणी देईना. वडिलांनी स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आणि चित्तरंजनांनी आपलेही नाव दिवाळखोर म्हणून नोंदले. पित्याची अप्रतिष्ठा स्वत:वरही घेतली. कोर्टात काम मिळेना. यातायात, वंगभंग चळवळ आली. खुदिरामने बाँब फेकला. एका मॅजिस्ट्रेटने भरमसाट शिक्षा दिल्या. एका मुलाला फटक्याची शिक्षा देण्यात आली. म्हणून या मजिस्ट्रेटवर खुदिराम चवताळून गेला; परंतु बॉब चुकून दुसम्यावरच पडला. पुढे कट सापडला. माणिकतोळा बाँब खटला सुरु झाला. अरविंद घोष, त्यांचे भाऊ बारिंद्र, अनेक आरोपी, वकील नीट मिळेला. अरविंदांच्या बहिणीने माझ्या भावाला वाचवा म्हणून पत्रक काढले.
आणि चित्तरंजन धावले. सहा महिने रात्रंदिवस काम करीत होते. “अरविंद वेदांतही आहेत. वेदांत सांगतो, तुझा उद्धार करणारा तूच. हे जसे व्यक्तीच्या जीवनात तसेच राष्ट्राच्याही. राष्ट्राला स्वत:चा आत्मा हवा असेल, तर राष्ट्राने स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. तुम्ही स्वतंत्र व्हा. गुलामाला कोठला विकास? तुम्ही ईश्वराचे अंश. ते तेज प्रकट करा. स्वातंत्र्याच्या रुपानेच ते प्रकट होईल.
हे स्वातंत्र्य मिळविताना कष्ट पडले तर भोगा. तुरुंगात जा. दुर्बळपणा नको." अशी अरविंदांची शिकवण. चित्तरंजन म्हणाले, “अरविंदांनी दहशतवाद नाही शिकवला. त्यांनी सविनय कायदेभंग शिकवला." देशबंधूंनी या बचावाच्या भाषणात पॅसिव्ह रेझिस्टन्स' हा शब्द वापरला आहे. आफ्रिकेतील थोर सत्याग्रह अजून पुढे यायचा आहे.
बारिंद्र, उल्हासकर वगैरेंचेही खटले देशबंधूंनी चालवले व त्यांच्या फाशीच्या सजा जन्मठेपेच्या केल्या, चित्तरंजन पहिल्या प्रतीचे बॅरिस्टर झाले. पॅक्टिस शिगेला पोचली. वर्षाला तीन लाखांची प्रैक्टिस; परंतु कुबेराप्रमाणे मिळवून कर्णाप्रमाणे देत. त्यावेळेस ते सुटीत इंग्लंडला जात. काव्यशास्त्रात रमत. पत्नी वासन्तीदेवी. उभयतांचे एकमेकांवर फार प्रेम, वासन्तीदेवी म्हणायच्या, “चित्त, कोणत्या रंगाचे पातळ नेसू? अस्मानी नेस." असा विनोद.
बॅरिस्टर होऊन आले तेव्हा दारिद्य, निराशा. त्यावेळेस वैष्णवगीते रचली; परंतु त्यांचे सागरसंगीत हे भव्य खंडकाव्य आहे. आई मरताना चित्तरंजन जवळ नव्हते. म्हणून म्हणाली, "त्यांचे सागरसंगीत आणून द्या. त्यात तो आहे." आई म्हणायची, "जन्मोजन्मी चित्तरंजनाची आई होण्याचे भाग्य मिळो." चित्तरंजनांचे हृदय सागराप्रमाणेच उसळे, उचंबळे.
आणि लोकमान्य टिळक सुटून आले. महायुद्ध झाले. माटेग्यू कमिशन आले. साक्षीत एका प्रश्नाला उत्तर देताना देशबंधू म्हणाले, “आम्ही स्वराज्यास नालायक असू तर तुम्ही दीडशे वर्षे काय केले? तुमची नालायकी सिद्ध होते, आमची नव्हे." ते तेजस्वी शब्द ऐकून बंगालचा गव्हर्नर उठून गेला; परंतु माँटेग्यू बोलत बसले.
नवीन सुधारणा येणार होत्या; परंतु आधी रौलेक्ट बिल आले. साबरमतीचा महान सत्याग्रही उभा राहिला. हजारो वर्षांत न मारलेली आत्म्याची हाक आली. देशबंधूंनी सत्याग्रह पत्रावर पहिली स्वाक्षरी केली. जालियनवाला बाग, असहकार सारे आले. लोकमान्यांचे निधन, नागपूरला । असहकाराला विरोध करायला म्हणून देशबंधू आले; परंतु महात्माजींनी त्यांनाच ठराव मांडायला लावला. कोणी प्रश्न केला. "तुमची वकिली?" चित्तरंजन म्हणाले, "मी बोलतो तसा वागतो." महिन्याच्या 50 हजारांच्या प्राप्तीवर पाणी सोडून यज्ञमूर्ती उभी राहिली. घोंगडीवर निजू लागले. पाठ दुखे, मित्र म्हणाला, “गादी देऊ?" तर रागावून म्हणाले, “देशसेवकाला गादी शोभत नाही." देशबंधू तुरुंगात असताना बाडोंलीचा लढा थांबला. गांधीजींना शिक्षा. पुढे देशबंधू सुटले. त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापला. बंगालभर वणवण हिंडून निधी जमवला. देशभर दौरे. तिकडे चांदपूरच्या मजुरांवर अत्याचार झाल्याचे ऐकले, तर तुफान पद्यानदीत नाव लोटून गेले. "वादळांत मेलो तरी चालेल परंतु गेले पाहिजे," म्हणाले. परंतु आजारी पडले.
मरताना शांत. महात्माजी भेटायला गेले. गांधीजी म्हणाले, 'देशबंधूंचा अंतरात्मा आता कळला." भारतभूमीवर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात, “बाल्यापासून प्रेम करीत आलो मी या भूमीवर, तरुणपणात मी चुकलो असेन, पडलो असेन तरी मातृभूमीवर प्रेम करीतच होतो. आज उतारवयातही ती मूर्ती मी हृदयात ठेवली आहे. भारतमातेची ही मूर्ती आज अधिकच सत्यतेनं अंतरंगात मला दिसत आहे."
दहशतवादी तरुणांच्या त्यागाचे ते कौतुक करीत. म्हणतात, "कोणत्याही स्वरूपातील राजकीय खून वा अत्याचार यांचा मी कट्टर विरोधक आहे. मला त्यांची शिसारी आहे. या देशातील राजकारणात खून, अत्याचार शिरतील तर स्वराज्याचे सुंदर स्वप्न भंगेल."
स्वराज्याची कल्पना मांडताना ते म्हणाले, “वसाहतीचे स्वराज्य म्हणजे बंधन नव्हे, दास्य नव्हे. तुम्ही एकत्र रहा वा फुटून निघा. महायुद्धापूर्वी फुटून निघण्याची वृत्ती होती. परंतु एकत्र राहणे बरे. कॉमनवेल्थमध्ये राहणे बरे असे आता वाटत आहे."
भारताविषयीची कल्पना साकार करताना ते म्हणाले, “प्रांतांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य असावे. त्या प्रांताने आपल्या विशिष्ट संस्कृतीनुसार वाढावे हेच योग्य. परंतु भारताच्या बंधनाने, भारताच्या सेवाभावाने एकत्र सारे सांधलेले, एकजीव झालेले, असे हे हिंदी संघराज्य. जगातील सर्व राष्ट्रांचे जे जागतिक संघराज्य होईल. त्यातील हिंदी संघराज्य हा भाग. जागतिक संघराज्य मानवतेच्या सेवा भावनेवर अवलंबून आहे. ज्या मानाने सर्वांची सेवा नि सर्वांना स्वातंत्र्य देऊ त्या मानाने जागतिक संघराज्य मानवांमध्ये ऐक्य नि शांति ठेवू शकेल."
अशा रीतीने प्रांतिक स्वायत्तता, भारतीय संघराज्य, जागतिक संघराज्य या कल्पनेपर्यंत ते भरारी मारीत. आशियाई राष्ट्रांची परिषद बोलवू इच्छित होते. मरणाआधी एका मित्राला म्हणाले, “मी रविंद्रांवर त्यांच्या विश्वप्रेमासाठी टीका केली, भांडलो. परंतु ते थोर आहेत. त्यांना माझा प्रणाम सांगा. गीतांजलीच्या रविंद्रांना आशियाई राष्ट्रांचे संमेलन बोलवायला सांगा. त्यांच्याहून कोण अधिक पात्र?"
देशबंधू अनेक देशभक्तांना, क्रांतिकारकांना त्यांच्या कुटुंबांना पोसायचे. कलकत्याच्या तुरुंगात असता तिकडे बाहेर बारिसालच्या सभेत वासंतीदेवी अध्यक्ष असता वंदेमातरम् म्हणायला बंदी होती. ऐकून सिंहाप्रमाणे फेन्या घालीत राहिले. हिने सहन कसे केले म्हणत! हा मनुष्य फसवील असे त्यांना वाटले तरी त्याला मदत देत व म्हणत, "चक्षुर्लज्जा, तुझे केविलवाणे तोंड बघवत नाही." सभा परिषद संपली की, स्वयंसेवकांना स्वत: वाढायचे. महात्माजींना एकदा म्हणाले, "हे तरुण ही माझी शक्ती." नेताजी सुभाष हे तरुणांमधील तळपते बालतरुण. देशबंधूंनाच ते आपला राजकीय गुरू मानीत. देशबंधूंचे जीवन म्हणजे स्फूर्तीचा अनंत ठेवा. विश्रांतिहीन कर्तव्य, असीम त्याग! 16/6/1925 मध्ये दार्जिलिंगला हिमालयाच्या धवल शिखरांच्या सान्निध्यात हा महापुरुष अनंतात विलीन झाला.
COMMENTS