Marathi Speech on "Sindhutai Sapkal", "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मराठी निबंध", "सिंधुताई सपकाळ भाषण मराठी" for Students

Admin
0

Sindhutai Sapkal Speech in Marathi: In this article "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मराठी निबंध", "सिंधुताई सपकाळ भाषण मराठी" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Speech on "Sindhutai Sapkal", "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मराठी निबंध", "सिंधुताई सपकाळ भाषण मराठी" for Students

Marathi Speech on "Sindhutai Sapkal", "अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मराठी निबंध", "सिंधुताई सपकाळ भाषण मराठी" for Students

'दिव्यत्वाची जेथ प्रचिती,

तेथे कर माझे जुळती' 

ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय यावा म्हणून 'आई'ची निर्मिती केली. 

रस्त्यावर कुठेही असाहाय्य अवस्थेत पडलेल्या मुलांना मातृत्वाच्या पदराखाली घेऊन माया लावणारी विदर्भकन्या सिंधूताई सपकाळ या 'अनाथांची माय' म्हणूनच ओळखल्या जातात.

विदर्भातील वर्धा जिल्ह्यामधील पिंपरी (मेघे) येथील खेड्यात एका अतिसामान्य कुटुंबात १४ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. मराठी चौथीपर्यंत शिक्षण झालेले असले तरी त्यांची वाचनाची गती विलक्षण! छोटे चुटके, गीत, कविता, शेर यातून त्या विचारमंचावर बसून दोनच मिनिटांत श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतात, ते अनाथांच्या मदतीसाठी, तेही स्वतःचा पदर पसरून! 

अशा नकोशा, अनाथ मुलांचा सांभाळ करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांचे पुनरुत्थान करणे सोपे नव्हते. त्यांना शिक्षण देऊन नोकरी/ कामाला लावून एक चांगला नागरिक बनण्याचे शिवधनुष्य सिंधूताईंनी उचलले. 

वयाच्या अकराव्या वर्षी त्या साठेच्या सपकाळ झाल्या. पोटात अंकुर वाढत असताना पती श्रीहरीने त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊन त्यांना घरातून हाकलून दिले. माहेरही त्यांना पारखे झाले, तेव्हा एका गोठ्यात त्यांनी एका कन्येला जन्म दिला.

अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत असताना एकदा तर आत्महत्येचाही विचार माईंच्या मनात आला; पण आपल्या माघारी आपल्या बाळाचे काय? बाळाच्या रडण्यानं त्या भानावर आल्या. सिंधूताईंमधील आई नव्यानं जन्माला आली.

आदिवासी, वनवासी यांच्या व्यथावेदनांसोबत माई असंख्य अनाथ मुलांची आई झाली. आईच्या ममतेने त्यांना हृदयाशी घेतलं. ('चिंधी' हे त्यांचं सासरचं नाव.) अनाथ मुला-मुलींना हक्काचे घर आणि आई दोन्ही मिळवून देण्याचे जगावेगळे काम त्यांनी केले.

काही मुले उकिरड्यावर सापडलेली, काही मुलांच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, काही रेल्वे, एस. टी. स्थानकावर सापडलेली, त्यांच्या पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय नसणारी, शिक्षण तर खूप दूरच! अशांना जवळ करून व्याख्यान देऊन मिळणाऱ्या मानधनातून, लोकवर्गणीतून माईंनी त्यांचा सांभाळ केला.

मुले मोठी झाल्यावर उद्योगधंदा करायला लागल्यावर त्यांची योग्य वेळी विवाह करून देऊन त्यांचे संसारही त्या थाटून देतात.

१९९० साली 'मी वनवासी' हे सिंधूताईंचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. सावित्रीबाई फुले यांना देखील समाजात अपेक्षित बदल करताना अनेक यातना सहन कराव्या लागल्या होत्या. अगदी तशाच यातना सिंधूताईंनी सोसल्या. युती सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देऊन गौरविले. याशिवाय २७३ राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना मिळालेले आहेत.

सिंधू- नदी- जीवनदान देणारी, अनेकांचे मातृत्वपद मनापासून स्वीकारणारी, अनाथांना सनाथ करणारी, आपले नाव सार्थ ठरवणारी माय!

आज समाज त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याकडे अतिशय आदराने पाहतो; पण म्हणतात ना 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण.' अशा काटेरी मार्गावरून चालत असताना अनेक अपमानांना त्या सामोऱ्या गेल्या.

आजही त्यांची वणवण थांबलेली नाही. समाजाकडे मदतीसाठी त्या आजही हात पसरतात.

सिंधूताई तुमच्या या कार्याला सलाम!

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !