Wednesday, 14 August 2019

मानवता धर्म मराठी निबंध - Manavta Dharm Nibandh Marathi

Today, we are publishing मानवता धर्म मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Manavta Dharm Nibandh Marathi) in completing their homework and in competition.

मानवता धर्म मराठी निबंध - Manavta Dharm Nibandh Marathi

"खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे" 
साने गुरुजींनी अगदी एका वाक्यात खऱ्या धर्माची मार्मिक व व्यापक व्याख्या केली आहे. जगात अनेक जाती, धर्म, पंथ आहेत. केवळ आमच्या भारत देशातच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध अशा कितीतरी धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाला आपला धर्म तेवढा श्रेष्ठ वाटतो आणि म्हणूनच इतरांच्या धर्मावर टीका केली जाते. खरे पाहता कोणताच धर्म वाईट नसतो. विनोबा भावे म्हणतात, “धर्म हा मातेप्रमाणे श्रेष्ठ असतो आणि पवित्र असतो. जो खरा मातृभक्त असतो तो कोणाच्याही मातेची निंदा करत नाही." कवी शिवमंगलसिंह 'सुमन' यांनी म्हटले आहे.
"जाति-पाँति से बड़ा धर्म है, 
ध्यान-धर्म से बड़ा कर्म है, 
मगर सबसे बड़ा यहाँ यह छोटा-सा
इन्सान है।" 
आणि म्हणूनच माणुसकी जोपासणारा, मानवाच्या अंत:करणात ईश्वराला पाहणारा जो धर्म तो खरा मानवता धर्म. माणसाने माणसांशी माणुसकीने वागणे म्हणजे मानवता होय. आज विज्ञान युगात मानवाचे जीवन ऐषारामी बनले आहे. भौतिक सुख-सुविधांची रेलचेल झाली आहे. परंतु माणूस मन:स्वास्थ्य हरवून बसला आहे. अत्याधिक लोभ, मोह व स्वार्थ यामुळे मनुष्य एवढा क्रूर बनला आहे की, 'कुन्हाडीचा दांडा गोतास काळ' तद्वत माणूसच माणसाचा शत्रू बनला आहे.
अंत्यजाच्या बाळाला कडेवर उचलून घेणाऱ्या, गाढवाच्या तोंडात काशीची गंगा ओतणाऱ्या एकनाथ महाराजांनी दाखवून दिलेला मानवता धर्म आज समाज विसरला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, संत कबीर यांनी वर्णिलेल्या धर्माचे विस्मरण झाले आहे. त्यामुळे दर दिवशी खून, मारामाऱ्या, जाळ-पोळ, बॉम्बस्फोट यांमध्ये शेकडो निरापराध जीवांचा नाहक बळी जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. माणूस वाघ, सिंहापेक्षा अधिक हिंस्र बनला आहे. अखिल मानव जात माणसकीला पारखी झाली आहे. कोणाचा-कोणावर विश्वास उरला नाही. परस्त्रीला मातेसमान मानणारे छत्रपती शिवाजी, आदर्श राजा प्रभू रामचंद्र यांचा आदर्श समाज विसरला आहे.

हे विश्वची माझे घर' मानून भूदान आंदोलन करणारे विनोबा भावे, आफ्रिकेतील गुलामांनाही स्वातंत्र्य व योग्य मानवी हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारे गांधीजी, अस्पृश्यावरील अन्यायाचे निवारण करणारे महात्मा फुले हे खरे मानवतेचे पुजारी होते. त्यांनी जीवनभर ज्या तत्त्वांचे पालन केले तो खरा मानवता धर्म. दया, क्षमा, करुणा, सौहार्द, परदुःख, कातरता इत्यादी गुण मानवतेचे द्योतक आहेत. 
जीवनातील इच्छाशक्तीला प्रयत्नांची साहसी जोड असेल तर काहीच अशक्य व असंभव नाही. विज्ञानाने अशक्य' या शब्दाची वास्तवातून हकालपट्टी केली आहे. पूर्वी परीकथेतून अथवा जादूगाराच्या कथेतून ऐकलेली आश्चर्ये आज प्रत्यक्षात उतरली आहेत. 

कोकण रेल्वेचा खडतर प्रकल्प आज मधु दंडवतेंच्या उच्च आकांक्षेतून मूर्त रूपात साकार झाला आहे. अनेक पर्वतांच्या पोटातून,खोल दऱ्यांच्या माथ्यावरून ही रेल्वे दिमाखाने धावते आहे.
“आकाशाला गवसणी घालणे" किंवा “आसमान के तारे तोड लाना'' यासारखे वाक्प्रचार आता केवळ वाक्प्रचार राहिले नाहीत. खरोखरच मानवाच्या आकांक्षेला आज गगन ठेंगणे भासत आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

2 comments:

  1. hello sir i request you would you please write a essay on " MANAVTECH DHADA" In marathi language.?

    ReplyDelete
    Replies
    1. Definitely i will, but sir would you please request your essay in marathi lipi?

      Delete