Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan : Today, we are providing सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10,...
Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan : Today, we are providing सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan to complete their homework.
सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan
“ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?"
असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला. लहानपणापासून खेळकर, खोडकर आणि धीट स्वभावाच्या सावित्रीचा वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये जोतिबांबरोबर विवाह झाला.
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
धूळपाटीवरील धुळाक्षरांनी त्यांची शिक्षणास सुरुवात झाली. मुलींना शिक्षण देणे हे सामाजिक परिवर्तनाचे मूलगामी साधन आहे, हे द्रष्ट्या सावित्रीबाईंनी जाणले.
भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालू ठेवले. मुलींना शिकवायला स्त्री-शिक्षिका असेल तरच शाळेत पाठवू, ही अट ऐकून काळाची गरज म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकविले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, हे जाणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे सावित्रीबाईंपासून केली.
१ जानेवारी, १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली; ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, सावित्रीबाई!
Read also : मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती
१५ मे, १८४८ रोजी महारवाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात महारवाड्यात शाळा काढणे, हे एक दिव्यच होते. मागास समाजातील शाळेत सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला.
त्या काळी मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नसत. त्यांना ते धर्माविरुद्ध वाटे; पण सावित्रीबाईंनी पालकांची समजूत काढून मुलींवर प्रेमाचे संस्कार करून त्यांना शाळेची गोडी लावली. या कामात त्यांना सगुणाबाईंची खूप मदत झाली. प्रतिकूल परिस्थितीतही न घाबरता पाच वर्षांत त्यांनी पुणे व परिसरात अठरा शाळा सुरू केल्या. त्यांच्या कार्याने भारावून जाऊन मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी फुले पती-पत्नीचा महावस्त्रे देऊन आदरपूर्वक सत्कारही झाला.
सावित्रीबाईंनी केवळ शिक्षण क्षेत्रात काम केले असे नाही, तर विधवा स्त्रिया, अनाथ मुले यांच्याही त्या माऊली झाल्या.
Read also : कल्पना चावला माहिती मराठी निबंध
१८५१ मध्ये अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७६ आणि १८९६ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. दानशूरांच्या मदतीने हजारो लोकांच्या जेवणाची सोय केली. समाजकार्याच्या अहोरात्र व्यापातून सावित्रीबाईंनी साहित्याची फुलबाग फुलवली.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिबांच्या निधनानंतरही त्या कार्यरत राहिल्या. जोतिबांचे सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन त्यांनी पुढे चालू ठेवले. अद्भुत चिकाटी, अतुलनीय धैर्य, अपूर्व तत्त्वनिष्ठा आणि असामान्य बुद्धिमत्ता या गुणांनी परिपूर्ण असं सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं.
१८९७ मध्ये पुणे परिसरात प्लेग रोगाची साथ आली होती. तेव्हा सावित्रीबाई आपले वय विसरून दीन-दलितांच्या, अपंगांच्या झोपड्यांमध्ये जाऊन अहोरात्र सेवा करीत राहिल्या. हे बहुमोलाचे कार्य करीत असताना त्यांनाही प्लेग या रोगाची बाधा झाली आणि स्वतः प्लेगची शिकार झाल्या. १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले; पण जाताना आपला दत्तकपुत्र डॉक्टर यशवंतलाही समाजसेवेची मोलाची शिकवण देण्यास त्या विसरल्या नाहीत. “मानवता हाच धर्म आहे. गरीब, अशिक्षित, दलित, अपंगांना मदत करायला कधीही मागेपुढे पाहू नकोस." त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून आपणही त्यांचा वारसा असाच पुढे चालू ठेवू या.
भारतातील पहिल्या महिला सावित्रीबाईंचे कार्य शिक्षिकाइतकेच मर्यादित नसून अनाथ मातांच्या कैवारी, विश्वविवाहाच्या पुरस्का , बालहत्या प्रतिबंधक संगोपनाच्या माता, स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या प्रणेत्या होत्या.
आपल्या काव्यातून समाजजागृती करून अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्यही त्यांनी केले. त्या जशा उत्तम साहित्यिका होत्या तशाच त्या प्रभावी वक्त्याही होत्या.
Read also : किरण बेदी मराठी निबंध
सावित्रिबाई एक बुद्धिमान लेखिका व प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. त्यांचा हा गुण अनेकांसाठी अपरिचित राहिला. १८५४ साली 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह, १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे सावित्रीबाईंचे साहित्य. त्यांच्या अनेक कवितांतून त्यांचं निसर्गप्रेम व भावसौंदर्य व्यक्त होतं. 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तक १८९१ मध्ये प्रसिद्ध झाले. १८९२ मध्ये 'जोतिबांची भाषणे' या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले.
महात्मा फुले यांच्या कार्यावर अढळ निष्ठा ठेवून सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिली स्त्री आहेत.
आजच्या पिढीला फुले पती-पत्नीचं जीवन आदर्श व प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही.
COMMENTS