Prithvi ki Atmakatha Essay in Marathi Language : Today, we are providing मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 &...
Prithvi ki Atmakatha Essay in Marathi Language : Today, we are providing मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Prithvi ki Atmakatha in Marathi Essay / Mi Pruthvi Bolte Marathi Essay to complete their homework.
मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध - Prithvi ki Atmakatha in Marathi Essay
मी घरात एकटीच अभ्यास करत बसले होते. अभ्यासाच्या टेबलावर पृथ्वी गोल ठेवलेला होता. वाचता वाचता मध्येच तो पृथ्वीगोल मी फिरवत होते आणि काय चमत्कार, चक्क तो पृथ्वी गोल माझ्याबरोबर बोलू लागला.“होय, मी पृथ्वीच बोलत आहे ! अग अशी दचकू नकोस. आज मला तुझ्याबरोबर बोलावेसे वाटते आहे. माझी कथा आणि व्यथा ऐक. माझा जन्म झाला, तेव्हा मी या अवकाशात फिरणारा तप्त गोळा होते. कालांतराने थंड होत गेले. हळूहळू माझ्या भोवती वातावरण निर्मिती होत गेली. पाणी निर्माण झाले. त्यामुळे नंतर हळूहळू वनस्पती आणि छोटे जीव निर्माण होऊन उत्क्रांती होत गेली आणि तुमचे पूर्वज जन्माला आले. तेव्हापासून मी मानवाच्या कल्याणासाठी झटते आहे. मानवाने आपल्या बुद्धी आणि ज्ञानाच्या आधाराने अनेक प्रकारच्या वनस्पती, अन्नधान्ये, फळे, फुले, त्यांच्या विविध नवीन जातीप्रजाती निर्माण केल्या. या सर्वांचाच मानव आजपर्यंत उपभोग घेत आहे. Read also : नदी बोलू लागली तर मराठी निबंध
विज्ञानाच्या मदतीने, आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने मानवाने मला सुखी केले. हे सर्व पाहून मला खूपच आनंद झाला, परंतु हाच मानव अति स्वार्थाने संकुचित मनोवृत्तीचा झाला. माझ्यावर सत्ता गाजवू लागला. इंच इंच भूमीसाठी आपापसांत भांडणे करू लागला. युद्ध करू लागला. त्यात माझाही विध्वंस करू लागला.
मला सर्व मानवजातीची लेकरे सारखीच आहेत. सर्वच माझ्यासाठी प्रिय आहेत. मी मानवासाठी गोड पाण्याच्या नदया निर्माण केल्या. सरोवरे निर्माण केली; पण मानवाने आपल्या कृत्याने ती देखील दूषित केली. स्वार्थापोटी जंगले नष्ट केली. त्याला पर्यायी व्यवस्था न करता, इतर ठिकाणी वृक्षांची लागवड न करता, प्राचीन, दुर्मिळ वृक्षांची बेसुमार तोड केली. जागोजागी जी वाळवंटे झालीत, तिला मानवच जबाबदार आहे. Read also : वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान निबंध / वृक्षांचे महत्व निबंध मराठी
मानवाला मी माझी लेकरे मानली. तो मला प्रेमाने, अभिमानाने आईचा आदर देतो. या मानवाकडून मी किती अपेक्षा बाळगल्या होत्या ! पण सारे काही व्यर्थ गेले. मला आता मानवाला ओरडून ओरडून सांगावेसे वाटते की, ज्या बुद्धीच्या जोरावर विज्ञानाच्या मदतीने तुला हे प्रचंड सामर्थ्य मिळाले आहे, त्याचा उपयोग प्रदूषण रोखून मला सुजलाम्सुफलाम् करण्यासाठी करायला हवा, संहारक शस्त्र निर्मितीसाठी नव्हे.
संपूर्ण जगतातील सारी माणसे माझीच लेकरे आहेत; पण माणसांनी काल्पनिक रेषांच्या सहाय्याने माझी विभागणी केली व त्यासाठी वाद घालून युद्धेही केली. हे अजूनही मानवाने थांबले नाही, तर तो स्वता:चाच सर्वनाश करून घेईल व पश्चात्ताप करण्याची वेळही त्याला कदाचित मिळणार नाही. Read also : जागतिक पर्यावरण दिवस निबंध मराठी
इतक्यात पृथ्वी बोलता बोलता गप्प झाली. मनात आले, खरेच सर्व मानवजातीने आपापसांतील
द्वेष, मत्सर, दुजाभाव विसरून एकोप्याने, गुण्यागोविदाने नांदायला हवे. असे झाले तरच, या पृथ्वीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
पृथ्वीचे आत्मवृत्त.
ReplyDelete