जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध - Jagtik Paryavaran Divas Marathi Essay ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. पर्यावरणात जर आम्ही स...
जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध - Jagtik Paryavaran Divas Marathi Essay
५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. पर्यावरणात जर आम्ही समतोल राखला तर मानवजात सृष्टीत टिकून राहील. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील आणि पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा समतोल. हा समतोल राखण्यात वृक्ष, झाडे आम्हाला खूप मदत करतात म्हणूनच भारतीय संस्कृतीमधील वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वृक्षांची, रोपांची पूजा करण्याची परंपरा खूप दूरदृष्टीची म्हणावी लागेल.
रोज संध्याकाळी तुळशीला पाणी घालून तिच्याजवळ दिवा लावायचा, वडपौर्णिमेला मोठमोठ्या पारंब्या असणा-या वडाची पूजा करायची. या आणि अशा रितीने वृक्षांचे जतन होते. पर्यावरणाचा समतोल साधतो. झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात ग्लोबल वॉर्मिंगपासूनही आम्हाला हे वृक्ष वाचवतात. एकाच ठिकाणी उभी राहणारी झाडे उन्ह, वारा, पाऊस सहन करतात आणि दुस-यांना सावली देतात. लाकूड, फळे, फुले, बिया, साल आणि औषधीमुळे सुद्धा आम्हाला हे वृक्षच देतात.
Read Also : वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध
पक्षी, प्राणी, कृमी असे अनेक जीव झाडांच्या आश्रयाने राहतात. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूचे हे जणू कारखाने आहेत. झाडे वाचली तर पर्यावरण सुरक्षित राहील आणि पर्यावरण आमचे म्हणजे मानवजातीचे रक्षण करील म्हणून जंगलांचे रक्षण आम्ही केले पाहिजे. ही जंगले तयार व्हायला हजारो वर्षांचा काळ जावा लागला. जंगले तोडायला मात्र अगदी थोडे दिवस पुरतात हे आम्ही विसरत आहोत.
उद्योग, कारखाने यांची बेफाम वाढ आज होते आहे. माणसे शहराकडे धाव घेत आहेत, या साच्यासाठी निर्दयपणे झाडे तोडली जातात. वृक्षप्रेमाचे हे जुने नाते माणूस विसरला आहे. आता स्वतःच्या सवयी बदलायची वेळ आली आहे.
Related Also : माझा आवडता छंद मराठी निबंध
कागदापेक्षा ई-मेलचा अधिक वापर, कमी ऊर्जेचे दिवे, वापरून फेकण्याच्या वस्तूऐवजी चिनी मातीच्या कपबश्या, पेपर नॅपकीन ऐवजी सुती टॉवेल, पाण्याचा जपून वापर हे आम्ही करायला हवे. पर्यावरणाचे भान आम्ही ठेवले तरच मानवजात वाचण्याची शक्यता आहे.
Read Also : महागाईचा भस्मासूर मराठी निबंध
जगाला वाचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाची योजना करण्यात आली आहे.
COMMENTS