Tuesday, 24 September 2019

माझा आवडता छंद निबंध मराठी - Maza Avadta Chand Essay in Marathi Language

Maza Avadta Chand Essay in Marathi Language : Today, we are providing माझा आवडता छंद निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Chand Essay in Marathi Language to complete their homework.

  माझा आवडता छंद निबंध मराठी - Maza Avadta Chand Short Essay in Marathi

  प्रत्येकालाच कोणता ना कोणता तरी छंद असतो. नसला तर तो असावा. माझ्या छंदामुळे इतरांना त्रास तर होत नाहीच, उलट त्यामुळे मलाच फायदा होतो. सांगा पाहू कोणता असेल माझा छंद?

  माझा छंद आहे सुवचने गोळा करणे. आम्हाला चौथीला एक बाई होत्या. त्या प्रत्येक गोष्टीत, वाक्यात सुवचने वापरायच्या. मी बाईंना धीर करून विचारले, “कसे हो तुमचे एवढे पाठांतर?" बाई म्हणाल्या, “लहानपणापासून मी खूप पुस्तके वाचली होती.” Read also : वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध

  हे बाईंचे ज्ञान पाहून मलाही सुरसुरी आली. मी एक वही केली. वहीत बाईंच्या वापरातील व इतर अनेक सुभाषिते लिहिली. बाईंनी मला साने गुरूजींची पुस्तके दिली. मला त्यात ओळीओळीतून सुवचने सापडली. पुढे बाईंचा छंद माझा छंद झाला.

  माझा सुवचन संग्रहांचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. मी तयार केलेला संग्रह पुन्हा: पुन्हा: वाचण्याचा मला छंदच लागला. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या वाचनातून दरवेळी मला अधिक व्यापक अर्थ सापडतो. आहे की नाही माझा छंद उत्कृष्ठ!

  माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी - Maza Avadta Chand Long Essay in Marathi

  मानवजीवन सुखदुःखाने भरलेले आहे. या त्याच्या नित्य जीवनात त्याला काहीतरी वेगळे करावेसे वाटते. काहीतरी व कसेतरी करून वेळ घालवणे म्हणजे छंद नव्हे, तर ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलेल, बहरेल अशी जीवनपोषक कृती म्हणजे छंद. छंद म्हणजे एक प्रकारचे वेडच होय; पण हे वेड इतरांना सुसह्य झाले व आपणास लाभदायक ठरले तरच त्याला छंद म्हणता येईल ! Read also : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध

  अनेक व्यक्तींना अनेक प्रकारचे छंद असतात. कोणाला पोस्टाची तिकिटे जमवण्याचा, नाणी व दुर्मिळ वस्तू जमवण्याचा किंवा चित्रे गोळा करण्याचा ! मला छंद आहे नवनवीन पुस्तके वाचण्याचा ! हा छंद मला बालपणापासून जडला आहे. आज मला वाटते माझे जे व्यक्तित्व घडले आहे त्याचा या छंदाशी फार जवळचा संबंध आहे. Read also : माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी

  मला या छंदाचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला; त्यामुळे माझ्या या छंदाला घरात चांगले खतपाणी घातले गेले. मला थोडी सवड सापडली की मी पुस्तकांवर अक्षरश: तुटून पडायचो. वडलांचे छोटेसे ग्रंथालय घरातच असल्याने मला नवनवीन पुस्तके सहजगत्या मिळत. त्यातच काही पुस्तकांवर त्यांच्या अधोरेखा, मधेमधे काही स्पष्टीकरणे असत: यामुळे काही विषयही मला सुलभतेने समजले. Read also : माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी

  मानवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत पस्तकांचा फार मोठा वाटा आहे. संस्कारक्षम बालवयात या वाचनाच्या छंदाने मजवर उत्तम संस्कार घडले. वाचनामुळे आपल्या ज्ञानकक्षा रुंदावतात. वाचनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या आपणास हजारो मैलांवरील माहिती प्राप्त होते. यासाठी फक्त आपण काय वाचायचे याची योग्य ती निवड करावयास हवी. बाबांच्या मार्गदर्शनाने माझ्या या छंदाचा मला खूपच फायदा झाला. Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

  विचारप्रधान, बुद्धीला आव्हान देणारी पुस्तके वाचल्याने ज्ञानाबरोबरच आपल्या बुद्धीची धार तीक्ष्ण होते. बुद्धिमान माणसांच्या बुद्धीला आव्हान देणाऱ्या समस्या पुस्तके आपणापुढे मांडतात. माणूस सांगोपांग विचार करू लागतो. मनोरंजन करणारी पुस्तके आपणास आनंद देतात. आपल्या दैनंदिन कष्टप्रद जीवनाला पुस्तके आनंदाची झालर लावतात. जीवनात निरागस, निरामय हर्ष निर्माण होतो. गंभीर ताणतणाव दूर करण्यासाठी विनोदी पुस्तके उपयोगी पडतात. या पुस्तकमेळ्यात जीवन सर्वार्थाने सकस बनते-कृतार्थ बनते. Read also : माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध

  माझ्या वडलांच्या ग्रंथालयात मीही भर घातली आहे. वाढदिवस व पाहण्यांच्या खाऊच्या पैशातून मी विविध विषयांवरील पुस्तके खरेदी करतो. माझी इच्छा आहे की कमीत कमी दहा हजार छोटेमोठे ग्रंथ जमवून होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी एक ग्रंथालय बनवायचे. त्यात हुशार विद्यार्थ्यांना एक मोफत अभ्यासकक्ष ठेवायचा. अशा प्रकारे समाजऋण फेडण्याची माझी मनीषा आहे. Read also : माझ्या मनातील झाड

  माझ्या मते म्हणूनच 'वाचनाचा छंद' हा सर्वात उत्तम छंद आहे. मला वाटते, तुम्हीही माझ्या या मताशी सहमत व्हाल. या छंदाने मला वेड लावले आहे; पण अशा वेडातही एक आगळा आनंद असतो. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !'

  This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

  SHARE THIS

  Author:

  I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

  0 Comments: