Tuesday, 4 February 2020

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध मराठी Me Pahilela Cricket Samana Marathi Nibandh

Me Pahilela Cricket Samana Marathi Nibandh : Today, we are providing मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Me Pahilela Cricket Samana Marathi Nibandh to complete their homework. 

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध मराठी Me Pahilela Cricket Samana Marathi Nibandh

३ मे २०१२ रोजी पुणे वॉरियर्सची मुंबई इंडियन्स संघाशी आयपीएल ५ ही क्रिकेट मॅच गहुंजे येथे सुब्रोतो रॉय सहारा स्टेडियमवर होती. ती मॅच पाहण्याचा 'योग' मला आला आणि मी हरखून गेलो.
आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग. क्रिकेट आणि भारत देश यांचे अतूट नाते आहे. आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असूनही गल्ली-बोळांमध्ये क्रिकेटचा सामना रंगलेला दिसतो.
पूर्वी पाच-पाच दिवसांचे कसोटी सामने असायचे. त्यानंतर वन-डे सामन्यांची लाट आली. आता तर काय, २०-२० ओव्हर्स खेळून सामन्याचा झटपट निकाल लागतो.
Read also : माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध
समाजातील श्रीमंत, प्रतिछित व्यक्ती आपल्याला हव्या त्या खेळाडूंना विकत घेऊन संघ तयार करतात आणि सामने भरवतात. त्यांनी भरवलेल्या सामन्यांना आयपीएलचे सामने म्हणतात.
या सामन्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, हरभजनसिंग यांच्यासारखे नामवंत खेळाडू खेळणार असल्याने महिनाभरापूर्वीच तिकिटे संपल्याची बातमी वृत्तपत्रांतून झळकली.
गहुंजे येथे बांधलेल्या सुब्रोतो रॉय स्टेडियमबद्दल मी खूप ऐकून होतो. बाहेरून ते पाहिलेही होते; पण प्रत्यक्ष सामना बघण्याचा आनंद खरोखरच अवर्णनीय.
खरं तर सामना रात्री ठीक ८ वाजता सुरू होणार होता; पण संध्याकाळी ४ वाजल्यापासूनच तिथं गर्दी होण्यास सुरुवात झाली.
READ ALSO : पावसाळ्यातील एक दिवस
स्टेडियम क्रिकेट शौकिनांनी गच्च भरले होते. त्यात युवकांबरोबर, वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती.
जिकडे-तिकडे लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्टेडियम दिव्यांच्या लखलखाटात न्हाऊन निघाले होते. प्रेक्षक हातात झेंडे, पिपाण्या, चौकार, षट्काराचे बोर्ड घेऊन गलबला करत आनंद लुटत होते.
अतिशय भव्य अशा त्या स्टेडियमच्या मधोमध हिरव्या गवताची खेळपट्टी उठून दिसत होती. स्कोअर बोर्ड, झुलता कॅमेरा पाहता क्षणीच नजरेत भरणारा होता.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हरभजनसिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
सचिन तेंडुलकरने आक्रमक पवित्रा घेत सलग तीन चौकार ठोकले. तेव्हा सचिन- सचिन असा जयघोष करत प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. खरं तर, प्रेक्षकांमध्ये पुणेकरांची संख्या जास्त होती. सचिन मुंबई संघाकडून खेळत होता, तरीही त्याच्या खेळाला प्रेक्षकांनी मनापासून दिलेली ती दाद होती.
Read also : शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध
सचिनचा प्रेक्षणीय खेळ प्रेक्षकांना भरभरून आनंद देत होता. एवढ्यात बाराव्या षट्काराच्या अखेरच्या चेंडूवर नेहराने सचिनला उथप्पाकरवी झेलबाद केले. संघाची भिस्त सचिनवर असल्याने तो बाद झाल्यानंतर त्यांचा खेळ स्थिरावला नाही. आणि निर्धारित २० षटकांत ९ बाद १२० धावाची मजल मारीत जिंकण्यासाठी पुणे वॉरिअर्सपुढे १२१ धावांचे लक्ष्य ठेवले.
पुणे वॉरिअर्स संघाचे खेळाडू दडपणाखाली खेळत आहेत असे वाटले. सौरव गांगुलीच्या संघाने चौकारांचा आधार घेत, तर कधी एकेरी थाव करीत ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. सामना खूप रंगला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कोण जिंकणार? पुणे वॉरियर्स की मुंबई इंडियन्स? आता पुणे वॉरिअर्सला प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकरांच्या अंगात उत्साह संचारला होता. पण हाय रे देवा! फक्त दोन धावा काढायच्या बाकी असताना डाव संपला. ६ नो बॉल मिळवूनही पुणे वॉरिअर्स फक्त दोन धावांनी हरले.
Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
खेळामध्ये हार-जीत असतेच; पण खेळ मनोरंजनही करतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंना पुणेकरांनी मनापासून प्रोत्साहन दिले आणि एक अप्रतिम सामना पहायला मिळाल्याचा आनंद सोबत घेऊन सर्व पुणेकर घरी परतले.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: