Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh : Today, we are providing शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 &...
Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh : Today, we are providing शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh / Bhashan Marathi Madhe to complete their homework.
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh
इयत्ता दहावीमध्ये आम्ही गेल्-ो अन् घरातले, बाहेरचे, शेजारचे-पाजारचे सगळेच आम्हाला दहावीच्या महत्त्वाच्या वर्षाबद्दल सांगू लागले. सगळ्यांचा रोख अभ्यासाकडेच होता.
पहिलीतून दुसरीत तसंच नववीतून दहावीत गेलो होतो ना, मग एवढा काय त्याचा बागुलबुवा करायचा?
शाळेतही अगदी पहिल्या दिवसापासून 'अभ्यासाला सुरुवात करा' असं शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी समजावलं आणि आम्हीही ते मनावर घेतलं. कारण दहावीत पास झालो तर एका वेगळ्या विश्वात आम्ही प्रवेश करणार होतो ना!
READ ALSO : निमंत्रण पत्रिका मराठी नमुना
अभ्यासाचं, खेळाचं नियोजन केलं. मार्गदर्शनासाठी शिक्षक होतेच. बघता बघता वर्ष कसं भुरकन उडून गेलं, ते कळलंच नाही. डिसेंबरमध्येच सर्व अध्यापकांनी आपले अध्यापन कार्य पूर्ण केले. आता उजळणीही सुरू झाली होती. अचानक एके दिवशी 'निरोप समारंभा'ची सूचना वर्गात आली. आम्ही सगळेच आनंदात होतो.

निरोप समारंभाच्या दिवसापर्यंत आम्हाला 'निरोपाचे गांभीर्य नव्हते. अगदी नटून-थटून आम्ही शाळेत आलो होतो. हसत काय होतो, खिदळत काय होतो!
शाळेच्या व्यासपीठावर मुख्याध्यापकाबरोबरच आमच्याच शाळेत शिकलेली विद्यार्थिनी जी आज सुप्रसिद्ध लेखिका आहे, त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
READ ALSO : मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध मराठी
मुख्याध्यापिकांच्या प्रास्ताविकानंतर पाहुण्यांचे स्वागत झाले. काही निवडक विद्यार्थ्यांनी भाषणासाठी नावे दिली होती, मीही भाषणासाठी उभी राहिले. आतापर्यंत दंगामस्ती करण्यातच वर्षामागून वर्षे गेली होती. माईक हातात घेतला आणि गुरुजनांना वंदन करून मी भाषणास सुरुवात केली.

"आईचे बोट धरून पहिलीमध्ये प्रवेश घेतला; पण गेली दहा वर्षे या शाळेने माझ्यावर इतके प्रेम केले की, आता आपण शाळेत जाणार नाही या कल्पनेनंच मला रडू येतंय. आम्ही खूप दंगा केला, शिक्षकांची बोलणी खाल्ली, मैत्रिणींशी बाकावरच्या जागेवरून भांडलो, अरेरावी केली.
मी तर इतकी हट्टी होते की, फळ्यावरचा सुविचार मीच लिहिणार. मॅडमनी सांगितलेलं काम मीच करणार. अशी दादागिरी (दीदीगिरी?) करायचे. माझ्या अनेक दुर्गुणांकडे शिक्षकांनी दुर्लक्ष केले आणि माझ्यातील गुणांवर लक्ष केंद्रित करून मला अभ्यासाची गोडी लावली. एकदा डॉजबॉल खेळताना माझ्या हातून शाळेतील खिडकीची काच फुटली, तेव्हा मी तर घाबरून रडायला लागले. तेव्हा मॅडमनी प्रेमाने मला जवळ घेऊन माझे अश्रू पुसले होते, हे मी कधीच विसरू शकत नाही.
READ ALSO : पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध
शाळेमुळेच आम्हाला शिस्त लागली. नियमित अभ्यास, खेळ, सहली यातून आम्ही संघटन, सहकार्य शिकलो. दरवर्षीच्या सहलींमुळे निसर्गाच्या जवळ जाता आले. वृक्षसंवर्धनाचा पाठ मिळाला. देशभक्ती, आईवडिलांबद्दल आदर, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची ओळख शालेय अध्यापनाबरोबरच झाली. आम्ही उत्तम नागरिक होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी यांचाही वाटा फार मोठा आहे. शाळेतील घंटा, आम्ही वर्षभर बसतो ते बेंच, तो फळा, मुख्याध्यापक, आमचे शिक्षक, शाळेतील शिपाई, सफाई कामगार या कुणालाच मी विसरू शकत नाही. कारण इथं मला प्रेम मिळालं. ही सगळी माणसं आम्हाला जीव लावीत घडवत होती. कुंभाराने जसा ओल्या मातीला आकार द्यावा तसा हे आम्हाला आकार देत होते. "पुन्हा हे आपले दिवस परत येणार नाहीत. अशा माझ्या शाळेचा मी आज निरोप घेताना मला गहिवरून आलं आहे." असं मी म्हटलं आणि ओक्साबोक्शी रडू लागले.
READ ALSO : शालेय जीवनातील गमती जमती मराठी निबंध
"छान केलंस हं भाषण! इतकी तयारी कधी केलीस?" असं मॅडमनी विचारलं. काय उत्तर देणार होते मी? मी तर भाषणाची मुळीच तयारी केली नव्हती. माझ्या डोक्यातील विचार एकामागोमाग एक नुसते धावत सुटले होते. खरंच, शालेय जीवन शब्दबद्ध करणं कठीण आहे. त्यापासून मी आता दुरावणार या विचारानेच मला बोलतं केलं.

COMMENTS