स्वामी विवेकानंद पर मराठी निबंध व भाषण। Swami Vivekananda in Marathi : १२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी हि भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.
स्वामी विवेकानंद पर मराठी निबंध व भाषण। Swami Vivekananda in Marathi
१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी हि भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.
सातव्या वर्षी त्याना शाळेत घातले. शाळेत ऐकलेल्या शिव्या तो शिकला. घरात सर्वांना तो शीव्या देऊ लागला. आईने त्याला शाळेतून काढून टाकले व स्व:त शिकवू लागली. बंगाली व इंग्रजी भाष्या त्यांनी नरेंद्र ला शकविल्या तसेच रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या पुढे नरेंद्र शहाणा झाला. व खूप हुशारही झाला. परत आठव्या वर्षी त्याना शाळेत घालण्यात आले.
पहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्याची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. एका मुसलमान गवयाकडे गायन शिकले.आखाड्यात जाउन कुस्त्या खेळू लागले. चांगले गोटीबंद शरीर कमाविले. त्यामुळे वर्गातील मुलें त्यांना भीत असत. ते सर्वांचे पुढारी होते. त्यांच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. १८७७ साली ते वडिलान सोबत रायपूरला गेले. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास करावा लागला. तिथे त्यावेळी शाळा तर नव्हतीच त्यावेळी त्याना तेथे रानावनातून फिरण्याचा व सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रसंग आला. व त्याचाच त्यांनी अभ्यास केला. १८७९ मध्ये परत कोलकत्त्याला आले.परत शाळा सुरु झाली त्यावेळी त्यांनी वाचनालयात जावून मोठ्मोठी ग्रंथ वाचलीत. त्यावरून अनेक विषय आत्मसाथ केले. फक्त एक दिवसात त्यांनी भुमितीच्या चारी भागांचा अभ्यास केला. ते खेळातही भाग घेत तसेच घोड्यावर बसण्यातही पटाईत होते. वादविवाद करण्यात ते सर्वांनाच हार्वीत असत. ते गाणे म्हणू लागले कि सारेच स्तब्ध होवून ऎकत. त्यांचा आवाज फारच गोड होता.
नरेंद्राने ब्राम्हण समाजात प्रवेश केला. मूर्ती मध्ये देव नाहीत,जाती नाहीश्या केल्याच पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजेत, हे विचार ऐईकून त्यांच्या मनात गोंधळ होत असे. तेव्हा देव खरच आहे कि नाही? असल्यास कोठे भेटेल? असल्यास त्याची भेट कोन घडवून देणार? या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्त झाले. ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांचे प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्न्न दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल!” नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां ?” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे तुलाहि देव सहज भेटेल.” केव्हा भेटेल मला देव ?नरेंद्राने विचारले, ” जेव्हा तुझ्या मनाला देव भेटण्याची तळमळ लागेल तेव्हा . “रामकृष्णांनी म्हटल्या नंतर हि त्यांचा त्यावर विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच बरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले. सर्वत्र प्रकाश पसरला. व नरेंद्रला सर्वत्र प्रकाश व परमेश्वरच दिसू लागला!
सन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्राने वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराचा भार उचलण्या ऎवजि संन्यास घेतला म्हणून आप्तेष्ट मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले पण नरेंद्रना गुरु कडून योग्य मार्ग मिळाला होता. आणि त्या मार्गानेच जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कर्क रोगाने आजारी पडले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले.त्यांच्या साठी नरेन्द्रही त्यांच्या सोबत गेला.रामकृष्ण त्यांना म्हणाले ” बेटा माझी सर्व योग शक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदूधर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर.,आपल्या राष्ट्राचा उद्धार कर.! “ऎवढे बोलून १५ ऑगष्ट १८८६ रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला, १८८८ साली नरेंद्र २५ वर्षाचे झाले. सर्व भारत फिरून बघावा अशी त्यांची ईच्छा झाली. आणि तेव्हाच प्रवासास निघाले.काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले, नरेंद्रला लोक पुढे स्वामी विवेकानंद म्हणू लागले. त्यांनी १८९० साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला बाहेर पडले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. १८९३ ला त्यांना ३० वर्षे पूर्ण झाली. स्वामींच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्र प्राप्ती झाली. स्वामी विवेकानंदा ना महाराजांनी अमेरिकेला जाण्यासाठी योग्य पोशाख व भाडे खर्चाला पैसे दिले.
३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले.व भगव्या रंगाचा पोशाख चढविला. व भगवा फेटा गुंडाळला भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरे. पण धीर करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले.
परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णा नची भविष्या वाणी खरी ठरली! त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. ! १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. १मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे काम त्यांनी दुसर्यावर सोपविले. ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
COMMENTS