Tuesday, 20 October 2020

Marathi Information on "Hiware Bazar", "हिवरे बाजार गावाची माहिती", "Hiware Bazar Marathi Mahiti" for Students

Hiware Bazar Village Information in Marathi: In this article "हिवरे बाजार गावाची माहिती", "आदर्श ग्राम Hiware Bazar Marathi Mahiti "for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Information on "Hiware Bazar Village", "हिवरे बाजार गावाची माहिती", "Hiware Bazar Marathi Mahiti" for Students

Marathi Information on "Hiware Bazar", "हिवरे बाजार गावाची माहिती", "Hiware Bazar Marathi Mahiti" for Students

नगर जिल्हयातील हिवरे बाजार हे छोटं गाव. २० वर्षांपूर्वी हे गाव कसं होतं? गावात दारूच्या भट्या होत्या. इथूनच आजूबाजूच्या गावांना दारूचा मुबलक पुरवठा होत असे.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य हे शब्दही त्यांना ठाऊक नसावेत अशी परिस्थिती होती. एखादया पोलीस अधिकाऱ्याची 'शिक्षा' म्हणून या गावात बदली होत असे. 

गावाची लोकसंख्या चौदाशेच्या आसपास. गावात एकही प्रौढ व्यक्ती आज बेरोजगार नाही. गावातल्या २२६ घरांना आज आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय. शेती व दुग्ध उत्पादन हे गावातले मुख्य व्यवसाय. या व्यवसायातून गावातील ६० कुटुंबं आज 'मिलेनियर' झाली आहेत. (त्यांच वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या वर आहे.)

या व्यवसायात स्त्रियाही अग्रेसर आहेत. गावात ऊस लागवडीला बंदी आहे. कारण उसाला खूप पाणी लागतं. इथलं मुख्य पीक कांदा. गावानं जलसंधारणाच्या योजना राबवून असा काही चमत्कार घडवून आणलाय की, वर्षभरात १०० मि.मी. पाऊस पडूनसुद्धा गावातल्या २५३ विहिरींना बाराही महिने पाणी असतं. गावात सोळा हातपंप आहेत. गावातल्या डोंगरावर गुरांना चरणं गावाच्या कायदयाविरुद्ध आहे. त्यामुळे चाऱ्याचं इतकं नियोजन होतं की, गावात तर चारा पुरतोच, उलट आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही चारा देता येतो. चराईबंदीचा एक फायदा असाही होतो की, डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी वाहून जात नाही. ते नैसर्गिकरीत्या अडवलं जातं, मुरवलं जातं.

पान, सिगारेट, तंबाखू, गुटखा या सगळ्याला गावात बंदी आहे. संपूर्ण नशाबंदी!

गावातल्या सगळ्या घरांना सारखा रंग. प्रत्येक घरावर घराच्या मालकाचं नाव सुंदर अक्षरात लिहिलेलं. गावातले रस्ते सिमेंट काँक्रिटचे प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय. शासनाचे ग्रामस्वच्छतेचे सगळे पुरस्कार या गावाला मिळाले नसते, तरच नवल!

गावातल्या महिला कुंकणी वापरून स्वयंपाक करत नाहीत, त्यांच्या दिमतीला १३० बायोगॅस आहेत. गावाचं स्वतःचं देखणं मंगल कार्यालय आहे.

गावातली जमीन किंवा घर बाहेरच्या माणसाला विकण्याची परवानगी नाही. जमीन विकत घ्यायची एखादयाची क्षमता नसेल तर गावातले चार शेतकरी त्याला मदत करतात. 

संपूर्ण गाव साक्षर आहे. गावात टुमदार शाळा आहे. शाळेला भव्य पटांगण आहे, स्टेज आहे. शाळेच्या भिंती माहिती, चित्र, सुविचारांनी नटल्या आहेत. शाळेच्या आवारातच शाळेचं स्वयंपाकघर आहे. शाळेच्या भिंतीवर सोमवार ते शनिवार दिला जाणारा मेन्यू (त्यातील पौष्टिक घटकांसह!) लिहिलेला असतो. एका भिंतीवर शाळेचा नकाशा आहे. मुला-मुलींसाठी वेगवेगळी शौचालय आहेत. त्यावर पाणी टाकलं ना? अशी विचारणा आहे. अपंग मुलांसाठी वेगळ्या शौचालयाची देखील सोय आहे. 

शाळेतील उपस्थिती व निकाल १०० टक्के आहे. प्रत्येक वर्गाला ग्रामपंचायती तर्फे पावडर, तेल, साबण व नेलकटरचं एक 'किट' देण्यात येतं.

विशेष म्हणजे संपूर्ण गावाचा एकच गणपती असतो. गावातले बरेचसे रस्ते गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधले आहेत.

गावात येणाऱ्या नव्या सुनेचं एच. आय. व्ही. सर्टिफिकेट ग्रामपंचायतीत सादर करण्याची सक्ती आहे. गावात एकही दवाखाना नाही. कारण कोणी आजारीच पडत नाही; कारण स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध गावकऱ्यांनी ओळखलाय. 

सरपंच पोपटराव पवार, त्यांचे ग्रामस्थ सहकारी यांनी या गावात चमत्कार घडवून आणला. अर्थात एका रात्रीत होणारा हा बदल नाही. बदलामुळे होणारे चांगले परिणाम सर्वांनाच हवेहवेसे वाटतात; परंतु ही बदल प्रक्रिया खूप संघर्षाची आणि तापदायक असते. पोपटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बदल घडवून आणण्यासाठी किती त्रास सहन केला असेल बरं?

आपला देश फक्त गप्पा मारून महासत्ता होणार नाही. त्यासाठी प्रत्येक गावात पोपटराव पवारांसारखे तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते तयार व्हावे लागतील.

अशा या आदर्श हिवरे बाजार या गावातील २३० कुटुंबापैकी ६० कुटुंब करोडपती आहेत. 

 इथल्या नागरिकांची महिन्याची सरासरी कमाई आहे ३०,००० रु. चला, या आदर्श गावाचा आपणही आदर्श घेऊया. आणि ही हिवरे बाजार हे काल्पनिक गाव नाही बरं का... तुम्हीही या गावाला भेट देऊ शकता!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: