आमच्या घरी गोठा आहे. आमच्या गोठ्यात दूध देणारी गुरे आहेत. या सर्वांत माझी आवडती गाय म्हणजे आमची कपिला ! आमच्या तांबू गाईने कपिलेला जन्म दि...
आमच्या घरी गोठा आहे. आमच्या गोठ्यात दूध देणारी गुरे आहेत. या सर्वांत माझी आवडती गाय म्हणजे आमची कपिला ! आमच्या तांबू गाईने कपिलेला जन्म दिला. कपिलेचा रंग पांढरा आहे व त्यावर काळ्या रंगाचे मोठे गोल ठिपके आहेत. तिच्या शुभ्र कपाळावर एक मोठा काळा गोल आहे. लहानपणी ती फारच सुंदर दिसत असे.
Essay on Cow in Marathi - माझी आवडती कपिला गाय
आमच्या घरी गोठा आहे. आमच्या गोठ्यात दूध देणारी गुरे आहेत. या सर्वांत माझी आवडती गाय म्हणजे आमची कपिला ! आमच्या तांबू गाईने कपिलेला जन्म दिला. कपिलेचा रंग पांढरा आहे व त्यावर काळ्या रंगाचे मोठे गोल ठिपके आहेत. तिच्या शुभ्र कपाळावर एक मोठा काळा गोल आहे. लहानपणी ती फारच सुंदर दिसत असे.
लहानपणापासून मी तिच्याशी भरपूर खेळत असे, पण तिने मला कधीही पाडले नाही किंवा कधी आपली शिंगे माझ्यावर रोखली नाहीत. कपिला गरीब आहे. सकाळी गुराख्याबरोबर ती चरायला जाते आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळी गोठ्यात परत येते. पण कुणाच्या शेतात जाऊन तिने नुकसान केले किंवा कुणाला ढकलले अशी तिच्याबद्दलची कधीही तक्रार आली नाही. कपिला माझी खूप लाडकी असल्याने मी तिची नेहमी काळजी घेत असतो.
कपिला मोठी झाल्यावर तिने वासरांना जन्म दिला. कपिला वासरांना पाजूनही भरपूर दूध देते. कपिला सर्वांची खूप लाडकी आहे. एकदा मात्र चरायला गेलेली कपिला परत आली नाही, तेव्हा आम्ही खूप काळजीत पडलो. दोन दिवस आम्ही कपिलेला जवळपासच्या गावातही शोधले, पण कपिला सापडली नाही. कपिला मिळणार नाही म्हणून आम्हांला फार दुःख झाले.
तिसऱ्या दिवशी मध्यरात्री आईला जाग आली ती कपिलेच्या हंबरण्याने ! आईने दार उघडले कपिला दारात उभी होती. सगळे घर जागे झाले होते. सर्वांना खूप आनंद झाला होता. आईने कपिलेला गोंजारले, तिला खाणे, पाणी दिले.
अशी ही आमची आवडती कपिला अगदी शेवटपर्यंत ती आमच्याच गोठ्यात राहणार आहे.
COMMENTS