Sunday, 19 December 2021

लाला लजपतराय मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Lala Lajpat Rai

Essay on Lala Lajpat Rai in Marathi Language : In this article read "माझा आवडता क्रांतिकारक लाला लजपतराय मराठी निबंध", "लाला लजपतराय निबंध मराठी", "Marathi Essay on Lala Lajpat Rai" for Students.

लाला लजपतराय मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Lala Lajpat Rai

लाला लजपतराय मराठी माहिती निबंध - "जे राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार नाही ते त्याला पात्र नाही. बाह्य मदतीने मिळविलेले स्वातंत्र्य पटकन जायचाही संभव असतो. क्रांती यशस्वी व्हायला तिचा पाया नैतिक व मानवी हवा. लोकांचा पाठिंबा हवा. लोकशाहीसाठी म्हणून ती क्रांती हवी. क्रांतिकारक संस्थांत गुप्तता येणे अपरिहार्य असेल तर नैतिकदृष्ट्या हितकर ठरेल."

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात ज्ञात-अज्ञात अशा लाखोंचे बलिदान आहे. परंतु गंगेचा साराच प्रवाह पुण्यवान असला तरी हरिद्वार, प्रयाग, काशी इत्यादी ठिकाणे जशी अधिक पवित्र वाटतात किंवा हिमालयाची अनंत शिखरे भव्य वाटली तरी कांचनगंगा, धवलगिरी, गौरीशंकर इत्यादी जशी भव्यत्तम वाटतात, त्याप्रमाणे लोकमान्य, लालाजी, देशबंधू, महात्माजी इत्यादी पुण्यलोक नावे आहेत. 1907-8 च्या काळात लाल, बाल आणि पाल ही तीन नावे भारतभर दुमदुमत होती.

लालाजी शिकले, वकील झाले. त्यांनी पैसा मिळविला. स्वामी दयानंदांच्या शिकवणीचा त्यांच्यावर परिणाम झाला. ते शैक्षणिक चळवळीत पडले. लाहोरची दयानंद शिक्षणसंस्था म्हणजे लालाजींच्या श्रमांचे फळ, त्यांनी आधी जवळचे 50 हजार रुपये टेबलावर ठेवले व मग लोकांजवळ मदत मागितली. परंतु शिक्षणात पडलेले लोकमान्य राजकारणात आले. लालाजी कसे दूर राहतील? ते वंगभंगाचे दिवस, लालाजींनी सारा पंजाब जागा केला. पंजाबात ‘भारत चळवळ' सुरू झाली. 'पगडी संभालो' हे घोषवाक्य होते. एका सभेत एक शीख तरुण लालाजींच्या भाषणाने संस्फूर्त झाला. म्हणाला, "11 लाख शीख तमच्या आज्ञेप्रमाणे वागायला तयार आहेत." गप्त पोलिसांचा अहवाल गेला की, 11 लाख सैन्य उभे करून लालाजी बंड करणार! त्यांना मंडालेस स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. लालाजींना न सोडतील तर पार्लमेंट उडवावे, मोर्लेसाहेबांवर बाँब टाकावा असे सेनापती बापट त्यावेळेस विलायतेतील क्रांतिकारकांना म्हणाले.

लालाजी सुटले; परंतु पुढे लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली. लालाजी अछत उद्धाराच्या कामाला लागणार होते; परंतु ते परदेशात गेले आणि महायुद्ध सुरु झाल्यामुळे अमेरिकेतच ते अडकले. तिकडे शेकडो लेख व भाषणे यांनी अमेरिकेला भारताची परिस्थिती निवेदिली. डॉ. हर्डीकर त्यांचे चिटणीस होते. लोकमान्यांनी सुटल्यावर लालाजींना कार्य चालवायला मदत केली. पुढे लालाजी परत आले. तो जालियनवाला बाग होऊन गेली होती. कलकत्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसभेचे जादा अधिवेशन भरून असहकाराचा ठराव मंजूर झाला. मतभेद असूनही लालाजी गांधीजींच्या बरोबर उभे राहिले. ते दिल्लीच्या विधिमंडळात गेले. शारदा बिलाच्या वेळेस अत्यंत आजारी असतानाही मत द्यायला गेले.

छातीला सूज आली व हा देशभक्तांचा मुकुटमणी 17/11/1928 रोजी देवाघरी गेला आणि पुढे बरोबर एक वर्षाने लालाजींवर लाठीचा प्रहार करणाऱ्या गोऱ्या सोजिरांचा अधिकारी साँडर्सचा खून झाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फाशी गेले. लालाजींचे भगतसिंगांवर फार प्रेम. भगतसिंगाला हवे ते पुस्तक ते मागवून देत. लालाजी केवळ चळवळे नव्हते, त्यांनी 'लोकसेवक संस्था' (Servants of the people) स्थापिली. 'पीपल' हे इंग्रजी साप्ताहिक व 'वंदेमातरम' हे उर्दू पत्र ते चालवित. दुष्काळ, भूकंप, कोठेही आपत्ती असो लालाजी पुढे असायचेच. त्यांनी उद्धृत अनेक पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजीतही त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. 'मदर इंडिया' या भारताची नालस्ती करणाऱ्या अमेरिकन पुस्तकाला 'अनहॅपी' या नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी उत्तर दिले. 1919 च्या त्यांनी अमेरिकेत सुरु केलेल्या यंग इंडिया मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात क्रांतीसंबंधी विचार हा लेख "क्रांतीचा विद्यार्थी" या नावाने लिहिला होता. त्यात ते म्हणतात, "जे राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार नाही ते त्याला पात्र नाही. बाह्य मदतीने मिळविलेले स्वातंत्र्य पटकन जायचाही संभव असतो. क्रांती यशस्वी व्हायला तिचा पाया नैतिक व मानवी हवा. लोकांचा पाठिंबा हवा. लोकशाहीसाठी म्हणन ती क्रांती हवी. क्रांतिकारक संस्थांत गुप्तता येणे अपरिहार्य असेल तर नैतिकदृष्ट्या हितकर ठरेल."

लालाजी, तुमच्या पुण्यस्मृतीस प्रणाम!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: