Monday, 12 August 2019

मजुराचे मनोगत मराठी निबंध

मजुराचे मनोगत मराठी निबंध

मुंबई शहरात हे टॉवर बांधले जात आहेत, त्या टॉवरवर काम करणारा मी एक मजूर आहे. गावात आम्ही सुखी होतो. पण सावकाराच्या कर्जात जमीन विकावी लागली म्हणून आम्ही मुंबईत आलो.
मुंबईत भाकरी मिळते, पण राहायला जागा मिळत नाही. धारावीच्या झोपड़पट्टीत एका झोपडीवाल्याच्या झोपडीत कसेबसे राहतो. त्यासाठी रोजचे पन्नास रुपये मोजावे लागतात. बायको मुलांना निवारा मिळतो. मी तर बाहेर रस्त्यावरच झोपतो.
बांधकामाची मला प्रथम सवय नव्हती. उंचावर काम करताना भीती वाटायची. पण करणार काय? बायको माझ्या बरोबरीने काम करते. तिला दिवसभर बाळू सिमेंट यांची घमेली वाहावी लागतात. खूप कष्ट पडतात. सकाळी लवकर उठून ती भाकरी व भाजी करते आणि आम्ही घर सोडतो.
कामाच्या ठिकाणीच कॉन्ट्रॅक्टरने एक शाळा उघडली आहे. तेथे माझी मुलगी व मुलगा शिकतात. आम्हां दोघांचे मिळून दिवसाला २२५ रुपये मिळतात. त्यात भाडे, जेवण, कपडे सगळे भागवावे लागते. गावालाही म्हाताऱ्या आईवडिलांना पैसे पाठवावे लागतात.
दिवस कसातरी जातो, पण भविष्याचे काय? या मुंबईत स्वत:ची एक झोपडी घेणेही मला शक्य नाही. मुंबईत कसे जगायचे एवढीच मला सतत काळजी लागून राहिलेली असते.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: