Mi Ravivar Boltoy Marathi Nibandh : Today, we are providing मी रविवार बोलतोय मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Stud...
Mi Ravivar Boltoy Marathi Nibandh : Today, we are providing मी रविवार बोलतोय मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Ravivar Boltoy Marathi Nibandh to complete their homework.
मी रविवार बोलतोय मराठी निबंध Mi Ravivar Boltoy Marathi Nibandh
“भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा,
आठवड्यातून 'रविवार' येईल का रे तीनदा?" मला हसूच आलं. सोमवार ते शनिवार ही माझी भावंडं तुम्हाला कामाला लावतात म्हणून त्यांचा इतका राग? आठवडाभर काम करून तुम्ही थकता. आठवडाभर शाळेत अभ्यास करून मुले कंटाळतात, हो ना? इंग्रजांनीही आठवडाभर कामामुळे चर्चमध्ये जायला जमत नाही, येशूचे दर्शन घेता येत नाही म्हणून 'रविवार' हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस ठरवला. आणि मग मी रविवार -विश्रांतीचा, मजेचा, आरामाचा, सुखाचा, हवाहवासा वाटणारा ठरूनच गेलो.
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
मला माहीत आहे, कधी कधी मी तुम्हाला नकोसाही होतो. शाळेतले शिक्षक जेव्हा 'रविवार' म्हणून खूप अभ्यास (गृहपाठ) करायला देतात. रविवार म्हणून आई घरातली काही कामेही सांगते. बाबांबरोबर तुम्हाला आठवड्याचा बाजार आणायला जावे लागते, तेव्हा तुमची चिडचिड होते; पण हे कधी-कधीच बरं का?
पण खरं तर रविवार म्हणून दोन दिवस आधीपासूनच सुट्टीचं नियोजन तुम्ही करता. समोरच्या गल्लीतील टीमबरोबर क्रिकेटची मॅच घेता, मित्र-मैत्रिणी मिळून रविवारी लवकर उठून फिरायला जायचा बेत करता, रविवारी जेवणासाठी 'खास' बेतही आईने ठरवलेला असतो, तर कधी निवांत उशिरा उठून आईने केलेल्या गरमागरम नाश्त्याचा आस्वाद दूरदर्शनसमोर बसून, पेपर वाचतवाचत तुम्ही घेता! मग बराच वेळ शॉवरखाली बसून अंघोळ, हो ना? दुपारी उन्हामुळे कोणत्या तरी मित्राच्या घरी बैठा खेळ किंवा मग टीव्ही आहेच की! संध्याकाळी पुन्हा मित्र-मैत्रिणी जमून गप्पा मारणे किंवा सिनेमा पाहणे साहजिकच आहे. रात्री झोपताना मात्र आता उद्या शाळा, काय बरं गृहपाठ दिला होता सरांनी आणि मॅडमनी? असा प्रश्न तुम्हाला पडतो.
Read also : If I Had Wings Essay in Marathi Language
Read also : If I Had Wings Essay in Marathi Language
पण खरच मित्रांनो, तुम्हाला आराम मिळावा, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून बदल मिळावा असं मला मनापासून वाटतं. कितीही अभ्यास असला, कितीही काम असलं तरी येणाऱ्या प्रत्येक रविवार'चं छानसं नियोजन करीत जा. कधी छोटीशी सहल, कधी सिनेमा-नाटक तर कधी नातेवाइकांची भेट, तर कधी ज्या गोष्टी आठवडाभरात करायच्या राहूनच गेल्या, जसं की, वर्तमानपत्र रोजच, निवांत वाचायला जमत नाही, त्यातील महत्त्वाची कात्रणं रविवारीच काढता येतील ना? किंवा कधी आई-बाबांना त्यांच्या कामात मदत तर करून बघा किती खूश होतात ते? जसं की वर्तमानपत्राची रद्दी नीट लावून ठेवणे, आपली कपबशी स्वच्छ धुऊन ठेवणे, आपल्या कपड्यांचे कपाट आपणच आवरणे, कधी फर्निचर पुसणे. आपले घर स्वच्छ, नीटनेटके असावे असं काय फक्त आई-बाबांनाच वाटावे? तुम्हाला नको?
Read also : माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन
Read also : माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन
आणि हे सगळं अगदी मनापासून, आनंदाने करा बरं का! उद्या शाळेत गेल्यावर मित्रांनाही आवर्जून सांगा की रविवार मला आवडतो. तो फक्त आळसात घालवण्यासाठी नाही, तर तो मला माझ्या आई-बाबांच्या खूप-खूप जवळ जाण्याची संधीही देतो आणि आजीच्या मऊ-मऊ पांघरुणात शिरून छान-छान गोष्टी ऐकण्याची मजाही देतो, म्हणून!
COMMENTS