Friday, 14 February 2020

शक्ती गौरव मराठी निबंध Shakti Gaurav Essay in Marathi Language

Shakti Gaurav Essay in Marathi Language : Today, we are providing शक्ती गौरव मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Kalpana Chawla Essay and Detail in Marathi to complete their homework. 

शक्ती गौरव मराठी निबंध Shakti Gaurav Essay in Marathi Language

संकल्प :शक्ती गौरवाचा ।
शक्तीने पावती सुखे । शक्ती नसता विटंबणा ।
शक्तीने नेटका प्राणी । वैभवे भोगिता दिसे ॥
श्रेष्ठ संत कवी समर्थ रामदासांच्या 'शक्ती गौरव' या कवितेतील या ओळी मानवी जीवनातील शक्तीचे महत्त्व सांगतात.
राष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी बलसंपन्न समाजाची आवश्यकता आहे म्हणूनच समर्थांनी बलोपासनेस प्राधान्य दिले. बलाच्या दैवताची म्हणजेच मारुतीची ११ मंदिरे सुयोग्य ठिकाणी स्थापून त्या देवळाला लागूनच तालमीची स्थापना त्यांनी केली.
शरीर हे सर्व सुखाचे साधन आहे. जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी साधन म्हणजे शरीर चांगल्या स्थितीत, तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
निसर्गाने आपल्याला जन्मतःच समृद्ध बनवून या पृथ्वीवर पाठवलं आहे. आपले शरीर एक मानवीयंत्र आहे. या यंत्रातील एक एक पार्ट बदलायचा म्हटला तर येणारा खर्च, आपण विचारात घेत नाही. होय ना?
एक किडनी म्हणजे मूत्रपिंड बदलायचे म्हटले तर दोन- तीन लाख, निसर्गाने दिलेल्या कॅमेरात लेन्स बसवण्यासाठीही काही हजार, गुडघे सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी लाखांमध्ये खर्च, हृदयामधील झडपा बंद झाल्या तर त्या उघडण्यासाठीही लाखांमध्ये खर्च, दंतारोपण, केशारोपण, अस्थिरोपणासाठी लागणारा खर्च वेगळाच!
मग अशा या मानवी यंत्राची आपण देखभाल करण्यासाठी किती टाळाटाळ करतो ना?
सायकल, गाडी, टीव्ही, फ्रीज या सगळ्यांची आपण काळजी घेतो; पण आपल्या अनमोल शरीरासाठी विशेष काय करतो?
सतत काम, अभ्यास आणि शारीरिक / मानसिक ताण याला आपलं शरीर सामोरं जात असतं. ज्या शरीरानं मिळविलेलं वैभव उपभोगायचं ते शरीरच कुरकुर करेल तर? म्हणूनच मित्रांनो, वेळीच जागे व्हा! आपल्या शरीरयंत्राची काळजी घ्या.
सकाळी लवकर उठून शुद्ध हवेत या शरीरयंत्राला फिरवून आणा; जेणेकरून हृदयविकार, वजन वाढणे, अतिरक्तदाब, अपचन, अतिरिक्त ताण या यंत्राला त्रास देणार नाहीत.
शरीररूपी यंत्राला प्रमाणातच अन्नरूपी इंधनसाठा पुरवा. खूप काम करून खूप पैसे मिळवाल; पण ज्याच्यामुळं काम आणि ज्याच्यासाठी काम ते शरीर सांभाळा.
आयुष्यात 'गती'ला महत्त्व आलंय; पण 'गती'मुळं पळता-पळता तुमची दमछाक होऊ नये म्हणून हे सारं प्रवचन.
शक्ती तो सर्व ही सुखे । शक्ती आनंद भोगावी।
साजिरी शक्ती तो काया । काया 'माया' ची वाढवी ।।
जीवनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येक यौद्धा सज्ज हवा ना?
कोण पुसे अशक्ताला? शक्तीने मिळती राज्ये।
सारं संसार शक्तीने । शक्तीने शक्ती भोगिजे ।

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: