Essay on Lokmanya tilak in Marathi : Today, We are publishing लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध for students of class 1, 2, 3, 4, 5, 6, 7...
Essay on Lokmanya tilak in Marathi : Today, We are publishing लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध for students of class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ,10, 11 & 12. Students can teachers can use this essay to complete their ptoject.
Essay on Lokmanya tilak in Marathi
भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून लोकमान्य टिळक आपल्या सर्वांना परिचित आहेत. जनक म्हणजे जन्म देणारा. टिळकांनी लोकांच्या मनात इंग्रजी सत्तेविषयी चीड निर्माण केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असे त्यांनी इंग्रजांना निक्षून सांगितले.
लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लहानपणापासून टिळकांना अन्यायाची चीड होती. खोटे बोलण्याचीसुद्धा त्यांना खूप चीड़ होती. एकदा मुलांनी वर्गात शेंगा खाल्ल्या. गुरुजी वर्गात आले तेव्हा त्यांना वर्गभर शेंगांची टरफले आढळली. गुरुजींनी मुलांना शेंगा कोणी खाल्ल्या विचारताच कोणीच उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना मार देण्याचे ठरविले. टिळकांचा नंबर येताच गुरुजींनी छड़ी उगारली पण टिळकांनी हात पुढे केला नाही. त्यांनी गुरुजींना धीटपणे उत्तर दिले की, मी वर्गात शेंगा खाल्ल्या नाहीत, तेव्हा मी मार खाणार नाही. गुरुजींनी त्यांना वर्गाबाहेर काढले. टिळकही तडकवर्गाबाहेर निघून गेले. Related Essay: सरदार वल्लभ भाई पटेल मराठी निबंध
हाच करारीपणीव धीटपणा त्यांनी आयुष्यभर अंगी बाळगला, काही दिवस शिक्षकाची नोकरी केल्यावर त्यांनी देशासाठी स्वत:ला समर्पित केले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी चळवळ केली. स्वातंत्र्याबरोबरच आपला समाज जागृत झाला पाहिजे, यासाठी त्यांची तळमळ होती. इंग्रज सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी लोकांची मने वळविली. त्यांनी लोकजागृतीसाठी 'केसरी' हे वर्तमानपत्र काढले. वर्तमानपत्राद्वारे त्यांनी लोकांच्या मनामनात स्वातंत्र्याची जागृती केली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्धयेका करून लोकांना इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास तयार केले. केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी आपले जहाल विचार लोकांसमोर मांडले. त्या काळी केसरी हे सर्वात लोकप्रिय वर्तमानपत्र होते. टिळकांचे विचार वाचून इंग्रजांचे धाबे दणाणले. त्यांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला व त्यांना मंडालेच्या तुरुंगात टाकले. Related Essay: राष्ट्रधर्म हाच खरा धर्म निबंध मराठी
मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.
टिळकांची बुद्धिमत्ता वाखाणण्यासारखी होती. गणित व ज्योतिष हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय तेजस्वी होते. त्यांचा करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावरच दिसायचा. इंग्रज सरकारला त्यांची फार धास्ती वाटत असे. टिळकांच्या महान कार्यासाठी जनतेने त्यांना 'लोकमान्य' ही पदवी बहाल केली होती. अशा या थोर पुरुषाचे १ आगॅस्ट,१९२० रोजी निधन झाले. दरवर्षी भारतभर १ ऑगस्टला टिळकपुण्यतिथी साजरी करतात.
Related Essay: माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
Related Essay: माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS