Saturday, 22 February 2020

चौकशी पत्र लेखन मराठी Chaukashi Patra in Marathi Language

Chaukashi Patra in Marathi Language: Today, we are providing article on चौकशी पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Chaukashi Patra in Marathi Language to complete their homework.

चौकशी पत्र लेखन मराठी Chaukashi Patra in Marathi Language

एखाद्या स्थळाविषयी किंवा ठिकाणाविषयी प्रत्यक्ष माहिती न घेता आपण पत्राद्वारे जी चौकशी करतो, त्यास चौकशीपत्र म्हणता येईल. चौकशी अनेक प्रकारची असू शकते. हे पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी.
१) चौकशी कशाची करावयाची आहे?
२) पत्र वाचणाऱ्याला समजेल अशा भाषेत प्रश्न सविस्तर विचारावेत.
३) 'तसदीबद्दल क्षमस्व' असे लिहिण्यास विसरू नये.
४) आपल्या पत्रातून आदरार्थी संबोधन असावे.
संगणक अभ्यासक्रमाची चौकशी

संगणक अभ्यासक्रमाची चौकशी पत्र

संग्राम | सारिका पाटसकर, शारदा ज्ञानमंदिर कल्याण, जि. ठाणे हा / ही अभिनव संगणक संस्था, अंबरनाथ, जि. ठाणे यांना इ.१०वी नंतरच्या संगणक अभ्यासक्रमाबद्दल चौकशी करणारे पत्र लिहीत आहे.
॥श्री॥
सारिका पाटसकर,
शारदा ज्ञानमंदिर, कल्याण,
जिल्हा ठाणे.
१/११/१२
मा. व्यवस्थापक,
अभिनव संगणक संस्था,
अंबरनाथ, जि. ठाणे
विषय : संगणक अभ्यासक्रमाची चौकशी
महोदय,
स. नमस्कार.
मी सारिका पाटसकर मार्च २०१३ मध्ये इ. १०वीची बोर्डाची परीक्षा देणार आहे. परीक्षा संपल्यानंतर कॉलेज सुरू होईपर्यंत आपल्या अभिनव संस्थेमध्ये शिकवला जाणारा एखादा 'शॉर्ट कोर्स' असल्यास मी आणि माझ्या काही मैत्रिणी प्रवेश घेऊ इच्छित आहे. सदर कोर्सची वेळ, त्याचा कालावधी, त्यासाठी असणारी फी यासंदर्भात आपल्याकडे छापील पत्रक असल्यास आमच्या शाळेच्या (वर पत्ता दिला आहे) पत्त्यावर पाठविल्यास सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
तसदीबद्दल क्षमस्व!
आपली कृपाभिलाषी,
सारिका पाटसकर

शैक्षणिक सहलीसाठी बसेसची सुविधा मिळणेबाबत चौकशी पत्र

॥श्री।
अ.ब.क.
माध्यमिक विद्यालय,
पिंपळेगुरव, पुणे - ६१
२७ जुलै २०१२
प्रति,
मा. व्यवस्थापक,
संत तुकारामनगर बसस्थानक,
पिंपरी.
विषय : शैक्षणिक सहलीसाठी बसेसची सुविधा मिळणेबाबत
महोदय,
मी विद्यार्थी प्रतिनिधी, माध्यमिक विद्यालय पिंपळेगुरव येथे इयत्ता १० वी 'अमध्ये शिकत आहे.
दिनांक १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट २०१२ या दोन दिवशी सलग सुट्टी आल्याने कोल्हापूरजवळ असणाऱ्या कंट क्लब' या ठिकाणी आम्ही शैक्षणिक सहलीचे नियोजन केले आहे. त्यासाठी त्या कालावधीमध्ये बसेस उपलब्ध होतील का? याबाबत चौकशीसाठी हे पत्र पाठवत आहे. तसेच अन्य काही प्रश्नांची उत्तरे आम्हास आपणाकडून मिळाल्यास आमचे शंका-समाधान होईल.
जसे : पुणे-कोल्हापूर अंतर किती कि.मी. आहे? प्रवास किती तासांचा आहे? प्रत्येक व्यक्तीस किती खर्च (भाड्यासाठी) येऊ शकतो? (इ. १० वीचे विद्यार्थी म्हणजे १४ ते १५ वर्षे वयोगटातील आहेत.) एक रात्र मुक्काम असल्याने किती (जास्त) चार्जेस पडतील? डिपॉझिट किती भरावे लागेल?
उत्तरांसाठी शाळेच्या पत्त्याचे पाकीट पाठवीत आहे. आपल्याकडून लवकरात लवकर उत्तराची अपेक्षा आहे. आपल्या उत्तरानंतर पुढील कार्यवाहीस गती येईल.
हे पत्र मी मा. मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहिले आहे.
तसदीबद्दल क्षमस्व!

आपला
अ.ब.क.

(सहल विभागप्रमुख
Read also :

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: