Granth Hech Guru Essay in Marathi Language : Today, we are providing ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 1...
Granth Hech Guru Essay in Marathi Language : Today, we are providing ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Granth Hech Guru Nibandh in Marathi Language to complete their homework.
ग्रंथ हेच गुरु / ग्रंथ मानवाचे मित्र / वाचनाचा छ /ग्रंथालय हे देवलाय
लिहिण्याची आणि विशेषतः छापण्याची कला मानवाने जेव्हापासून आत्मसात केली तेव्हापासून ग्रंथ हे मानवाचे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत हे सर्वमान्य झाले आहे. Read also : ग्रंथालय हेच देवालय निबंध मराठी
गुरु म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ, मोठा. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान प्रकाशाचे दान निरपेक्षपणे करणारे गुरु मानव जातीला श्रेष्ठत्व देत आले आहेत. ग्रंथातून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे सोपवता येते. माणसाच्या डोळे दिपविणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीचे रहस्य या ग्रंथातच दडले आहे.
ग्रंथ एकाकीपणात आपल्याला धीर देतात, आधार देतात. म्हणूच कितीतरी थोर व्यक्तींची मातृभूमीसाठी बंदी शाळेत. रवानगी झाली असता त्यांनी त्या अंधार कोठडीत खूप वाचन केले, अफाट लेखन केले. टिळकांच्या गीता रहस्याचे लेखन तुरुंगातच झाले. सावरकरानी तर 'कमला' हे खडकाव्य अदमानच्या काळकोठडीच्या भितीवर घायपाताच्या काट्याने लिहून काढले. Read also : एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
ग्रंथ आपल्याला इतके देतात आणि त्याबदल्यात धनाची, कौतुकाची थोडीही अपेक्षा करत नाहीत. आपल्याला विषय लवकर समजला नाही तरी कधी चिडत नाहीत रागवत नाहीत.
जो प्रदेश कधी पाहिला नाही त्याचे बारकाव्यांसकट दर्शन प्रवास वर्णनातून आपणास घडते, भूतकाळातील महान व्यक्तींवरील रसाळ ग्रंथाचे वाचन करताना त्या त्या व्यक्तीत्वाच्या कर्तृत्वाची संपूर्ण कल्पना आपणास येते.
रंजन करता करताच हसतखेळत ग्रंथ ज्ञान देत असतात. ते आपणास घडवत असतात. ते आपले केवळ मित्र नसतात. तर गुरु असतात. याच कारणासाठी वाचनाचा छंद आपण जोपासायला हवा. आपला रिकामा वेळ वाचनासाठी कामी लावला पाहिजे. Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
प्रत्येक गावात, गावातल्या लहान लहान भागात एकेक छोटेसे वाचनालय असावे. ज्यांना वाचायची आवड आहे. त्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळायलाच हवीत. कारण ग्रंथ केवळ गुरुच नाहीत तर मित्रही असतात. वाचनाचा. छंद असणाऱ्यांना ग्रंथालये ही देवालयाप्रमाणे वाटत असतात.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS