In this article, we are providing अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन निबंध मराठी for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can...
In this article, we are providing अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन निबंध मराठी for class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 & 10. Students can read अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन and use in completing theit homework. If you guys want more marathi essays, then you can our other essays.
अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन निबंध मराठी
आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पावसाचे महिने संपतात अन् आश्विन महिना उजाडतो. आषाढातल्या वीजांसह येणाऱ्या धुवांधार पावसात देवही निद्रीस्त झालेले असतात.
'श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे'
अशा ऊनपावसाच्या लपाछपीत श्रावण सरतो. 'गणपती बाप्पा मोरया' च्या आसमंत व्यापणाऱ्या गर्जनांनी भाद्रपद सरतो. आणि 'आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो...'च्या स्वरांनी आश्विन अवतरतो.
Related Essay : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
माझ्या आजोळी मामाकडे 'आश्विन शुद्ध प्रतिपदेला' घटस्थापना करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आई-बाबांच्या शनिवार-रविवारच्या सुटीत आम्ही मामाकडे कोकणात गेलो. ब्लॉक आणि सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात वाढणाऱ्या मला मामाकडचे वातावरण पाहन फारच आनंद झाला.
रात्री आम्ही अंगणातच झोपलो. अंगणातून रात्री शरदाच्या चांदण्या पाहतापाहता केव्हा झोप लागली कळलंच नाही. पहाटे-पहाटे पक्ष्यांच्या सुस्वरातील किलबिलाटाने जाग आली. क्षणभर मला कळेचना की, मी कुठे आहे?
Related Essay : माझी आजी निबंध मराठी मधून
थोड्या वेळाने मी भानावर आले. अवतीभवती हिरवी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट सारंच अनोखं वाटत होतं. दंग होऊन मी प्रसन्नपणे या साऱ्याचा आस्वाद घेत असतानाच, हिरव्या वृक्षांच्या शेंड्यांवर लालिमा पसरलेला दिसला. हिरव्या रंगाच्या डोंगरामधून 'सूर्य' डोकावत होता. ते दृश्य पाहून हिरव्या गालिच्यावरून आभाळाच्या निळ्या दुलईतून एखाद्या बाळाने रांगत रांगत पुढे यावं तसं वाटत होतं.
Related Essay : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
आपल्या बालमुठीतीत विविध रंगांच्या वैभवाची उधळण करत सूर्य वर येत होता. काहीही न सुचून मी या साऱ्याचा नजरेनेच आस्वाद घेत होते. आश्विनातील स्वच्छ वातावरणातील, एरवी प्रखर तेजस्वितेमुळे नजर न ठरणाऱ्या सूर्याचे ते कोवळे विलोभनीय रूप मी डोळ्यात साठवत होते.
नकळतपणे मला "या हो सूर्यनारायणा, या हो या लवकर या' या पूर्वी शिकलेल्या पाठ्यपुस्तकातील कवितेची आठवण झाली. ही कविता आठवता आठवताच ओठ 'घनःश्याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय झाला...' हे गीत आळवू लागले.
हे दृश्य मनात साठवत असेपर्यंत 'सूर्य' चांगलाच वर आला. आपल्या सोनेरी रंगाची उधळण त्याने कोणताही भेद न बाळगता मुक्तहस्ताने साऱ्या आसमंतात केली. मामाचा गावही आता जागा झाला होता. गावातल्या शेतकन्यांची लगबग सुरू झाली होती.
Related Essays : बैल पोळा निबंध मराठी माहिती
आपल्याजवळ असणारे सर्व काही, कोणताही भेद न बाळगता सर्वांना वाटणे, सर्वांबाबत समानतेचे तत्त्व ठेवणे, सर्वांना निःस्वार्थीपणे मदत करणे या सर्व चांगल्या गोष्टी सूर्यामध्ये असल्यामुळेच आजोबा सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. एरवी मी आजोबांची खूप थट्टा करते. पण आज मात्र माझ्याही नकळत माझे हात सूर्याकडे पाहन जोडले गेले. मला उठवायला आलेली आई माझं हे बदललेले रूप आश्चर्याने बघतच राहिली. अशी होती ती 'आश्विन महिन्यातील सकाळ' स्वच्छ, निरभ्र आकाशाप्रमाणे माझं मनही तसंच निर्मळ, शुद्ध, स्वच्छ करणारी.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS