Bail Pola is a bull festival mainly celebrated by farmers in the Goa and Maharashtra. In this article you will find बैल पोळा निबंध मराठी माहिती for students.
बैल पोळा निबंध मराठी माहिती - Bail Pola Nibandh Marathi Mahiti
शेतकऱ्याच्या जीवनात बैलपोळा हा एकमहत्वाचा सण आहे. श्रावण महिन्यात घाटावरील भागामध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. कोकणामध्ये हा सण बैल दिवाळीला म्हणजे मार्गशीष महिन्यामध्ये साजरा केला जातो.
Related Essays : गुढीपाडवा मराठी निबंध माहिती
बैल शेतामध्ये नांगर ओढतात, मोट ओढतात. अशा या कष्ट करणाऱ्या बैलांचे ऋण मानण्यासाठी बैलपोळा साजरा करतात.
Related Essays : राखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध
या दिवशी बैलाला नांगराला जुंपत नाहीत किंवा त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेत नाहीत. या बैलपोळ्याचे दिवशी बैलांना आंघोळ घालतात. शिंगाना रंग लावून गोंडे बांधतात. गळ्यामध्ये मण्यांच्या माळा बांधतात. कवड्यांच्या माळा बांधतात. मग शेतकऱ्याची बायको बैलांना ओवाळते, त्यांच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावते व त्यांची पूजा करते. नंतर बैलाना पुरणपोळी, आंबोळी असे गोडधोड खाऊ घालते.
Related Essays : शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
संध्याकाळी गावातील सर्वबैलगाड्या फुलांच्या माळा घालून सजवितात. बैलांच्या अंगावर झूली पांघरतात. मग वाद्यांच्या गजरात या बैलगाड्यांची मिरवणूक काढतात.
0 comments: