Monday, 12 August 2019

गुढीपाडवा मराठी निबंध माहिती - Gudi Padwa Marathi Nibandh

Gudhi Padwa is known as the traditional new year for Marathi and Konkani Hindus. It is mainly celebrated in Goa and Maharashtra. Find essay/nibandh on Gudi Padwa in marathi language for students in this asticle.

गुढीपाडवा मराठी निबंध माहिती - Gudi Padwa Marathi Nibandh

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू पंचांगाप्रमाणे नवीन वर्षाचा पहिला दिवस. वर्षातील महत्वाचा, उत्साहाचा, आनंदाचा ऋतू म्हणजे वसंतऋतू. वसंतऋतूच्या आगमनाची चाहूल किंवा वर्दी देणारा असा हा गुढीपाडवा. शालीवाहनने याच दिवशी शकाचा पराभव केला म्हणून 'शालिवाहन शक' याच दिवशी सुरू होते.

प्रभू रामचंद्रानी रावणाचा पराभव करुन, वनवास संपवून अयोध्या नगरीमध्ये याच दिवशी प्रवेश केला. आपल्या लाडक्या श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील प्रजेने गुढ्या - तोरणे उभारली व आनंदोत्सव साजरा केला. म्हणूनच आजही घरोघरी गुढी उभारली जाते.

अंगणामध्ये रांगोळी काढून त्यावर एक पाट मांडावयाचा. एक मोठी काठी घेऊन तिच्या टोकावर जरीचे केशरी कापड बांधावयाचे. त्यावर चांदीचा पेला अडकवायचा. त्याला कडुनिंबाचा टाळा बांधायचा. शिवाय रंगीबेरंगी बत्ताशांची माळ, फुलांच्या माळा घालून हीसजविलेलीगुढीदारामधेउभीकरावयाचीवतिची पूजा करावयाची. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा दिवस आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: