Shetkaryache Atmavrutta Marathi Nibandh : Today, we are publishing शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Shetkaryache Atmavrutta Marathi Nibandh) in completing their homework and in competition.
शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध। Shetkaryache Atmavrutta Marathi Nibandh
मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर माझी शेती अवलंबून असते. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब मी उपयोगात आणतो. माझे कुटुंब छोटे आहे. मी, माझी पत्नी आणि दोन मुले. माझी दोन्ही मुले शाळेत जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करतो.
Related : माझी आवडती कपिला गाय
कधी पाऊस रुसतो, अजिबात पडत नाही. कधी खूप कोसळतो. कधी अवेळी पडतो. कधी केलेली पेरणी फुकट जाते. तर कधी तयार झालेले पीक पाण्यात वाहून जाते वा कुजते. या साऱ्या संकटांचा सामना करायला आम्ही आता शिकलो आहोत पण जेव्हा पाऊस वेळेवर व हवा तेवढाच पडतो, तेव्हा आमचे शेत फुलून येते.
Related : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध
पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती. मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेताबरोबर मी छोटासा मळाही फुलवतो. मळ्यातील फळे, फुले विकून मला घरखर्चाला पैसा मिळतो. नेहमी पीक देणारी चिंच, नारळ अशी काही झाडेही मी लावली आहेत.
Related : माझा आवडता छंद मराठी निबंध
शेतात एखादे पीक खूप आले की पिकाचे भाव पडतात. शेतकऱ्याचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावी लागतात. मला माझ्या काळ्या आईची सेवा करण्यात खरोखर धन्यता वाटते.
Related : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
Related : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
This is help my daughter he is in 9th stander
ReplyDelete