News Writing in Marathi वृत्तलेखन मराठी नमुना for Students
वृत्त लिहिताना
वृत्तपत्रांतून आपण वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या वाचतो. वृत्तांतलेखनात घडून गेलेल्या सभा, समारंभ, संमेलन, शिबिरे, प्रदर्शने इ. चा थोडक्यात अहवाल लिहिला जातो. या लेखनात कल्पनेला वाव नसतो.
वृत्तांत लिहिताना
घटना कोठे, केव्हा घडली ते स्थळ आणि वेळ सांगणे. घडलेल्या प्रसंगाचे अत्यंत वास्तव आणि मोजक्या शब्दांत वर्णन करावे. वर्णन भूतकाळात केलेले असावे. वर्णन सुरुवातीकडून शेवटाकडे जाणारे असावे.
वृत्तलेखन - १
दि. १५/११/२०१६ म.टा. प्रतिनिधी, सोलापूर
रविवार दि. १३ - नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी येथील कळंब गावातील ऊस तोडणी कामगार भिकाजी गणोबा घुले पत्नीसह ऊस तोडणीस गेले असता, त्यांची मुलगी सरस्वती कपडे धुण्यासाठी आपला लहान भाऊ (कृष्णा) सह कालव्याजवळ गेली. सरस्वती कालव्यात कपडे धूत असताना कृष्णाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. हे पाहताच सरस्वतीने शिताफीने पाण्यात उडी मारून आपल्या भावाचे प्राण वाचवले. सर्वत्र या वीरबालेचे कौतुक होत आहे.
वृत्तलेखन - २
दि. २०/१०/२०१६ म.टा. प्रतिनिधी, अचलपूर
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त सिटी हायस्कूल, परतवाडा विद्यालयात 'वाचन प्रेरणादिन' साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथालयातील ग्रंथांची ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये रोटरी क्लब, अचलपूरचे अध्यक्ष श्री. धनंजय नाकील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व 'वाचेल तो वाचेल' अशा शब्दात पटवून दिले. प्रसिद्ध उद्योजक श्री. संतोष नरेडी यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी रु. १०००/ - देणगी म्हणून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती योगिनी पाटसकर यांनी केले.
0 comments: