मोठ्या बहिणीला पत्र मराठी Letter writing in Marathi to Sister

Admin
1
Letter writing in Marathi to Sister: Today, we are providing मोठ्या बहिणीला पत्र मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Letter writing in Marathi to Sister to complete their homework.

मोठ्या बहिणीला पत्र मराठी Letter writing in Marathi to Sister

संकेत रा. जाधव
कर्वे रोड, पुणे
३०.१०.१२
प्रिय शैला ताईस,
सप्रेम नमस्कार!
कालच तुझे पत्र मिळाले. तू माझ्यासाठी 'पार्कर'चा पेनसेट बक्षीस म्हणून आणणार असल्याचं लिहिलं आहेस; पण खरं सांगू ताई? तुझ्याकडून मला फक्त कौतुकाचे शब्दच ऐकायचे होते.
शाळेतील शिक्षकांकडून माझ्या ताईचे (म्हणजे तुझे बरं का!) नेहमीच कौतुक ऐकायला मिळते. म्हणून मीही ठरवलं. मी ताईचा भाऊ नको का शोभायला?
ताई, हा आत्मविश्वास तू मला दिलास. कधी समक्ष तर कधी पत्रातून वेळोवेळी तू मला मार्गदर्शन करत असतेस. त्यामुळेच तर मी विविध स्पर्धांमध्ये भागही घेतो आणि बक्षीसंही मिळवतो.
तुझा उत्साह, अभ्यासातील गोडी आणि सकारात्मक दृष्टिकोन मला भावतो (आवडतो).
ताई, मी खरंच नशीबवान आहे. कारण देवानं मला तुझ्यासारखी गुणी ताई दिली आहे. मी तुझा खूप-खूप आभारी आहे. अशीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. मग बघ, मी जीवनात किती यशस्वी होतो ते! :
कधी एकदा भेटून तुला सत्कार-समारंभाचे सविस्तर वर्णन सांगतोय, असं मला झालंय. लवकर ये. आई-पप्पा, राधाताई, क्षमाताई आम्ही सर्वजण तुझी वाट पाहतोय.
बाकी सर्व क्षेम,
कळावे!
तुझा भाऊ,

Post a Comment

1Comments
  1. विषय तुमची मोठि बहिन स्वराली हिचे तहशीलदार पदी निवड झाल्याबद्दल तीचे आभिनंदन पत्र लिहा

    ReplyDelete
Post a Comment

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !