पत्रातून सहलीचे वर्णन करा - Letter Writing To Your Friend about your school trip in Marathi

Admin
0
Letter Writing To Your Friend about your school trip in Marathi : Today, we are providing पत्रातून सहलीचे वर्णन करा For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Letter to Friend about your school trip in Marathi to complete their homework.

पत्रातून सहलीचे वर्णन करा - Letter Writing To Your Friend about your school trip in Marathi

नागपूर.
प्रिय वरुणला सप्रेम नमस्कार,
     आजच तुझे पत्र मिळाले. पोहण्याच्या आंतरशालेय स्पर्धेत तुला प्रथम पारितोषिकाचे पहिले बक्षीस मिळाले हे वाचून अतिशय आनंद झाला. तुझ्या ह्या यशाबद्दल तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.

     आमच्या सहलीविषयी तू फोनवर विचारत होतास ना? तो सुंदर अनुभव मी पत्रातून कळवतो आहे. पत्र पुन्हा पुन्हा वाचून त्या आनंदात तुला सुद्धा सहभागी होता येईल.

     मागच्या महिन्यात शाळेला सलग दोन दिवस सुट्टी मिळाली. खूप दिवसात आजोबांच्या शेतावर जाणे जमले नव्हते म्हणून आम्ही घरच्यांनी कोजागिरीसाठी तिकडेच जाण्याचा बेत ठरवला. आमच्या कारमध्ये आई, बाबा, आम्ही दोघं बहीण भाऊ आणि आजी असे पाच आणि आजोबांच्या कारमध्ये आत्या, तिची दोन मुलं आणि माझा मित्र स्वरूप असे आम्ही पहाटे नागपूरहून निघालो आणि दीड दोन तासात सावली या गावी जाऊन पोहोचलो.

     शेतातले छोटेसे कौलारू घर, बाजूचा गोठा, सडा घातलेले अंगण आणि भोवती शेतातली डोलणारीझाडं पाहून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. गरम गरम भाकरी, भरीत, मिरचीचा ठेचा, घट्ट दही हा तिथला बेत तर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा उत्कृष्ट वाटला.

     खरा सुंदर अनुभव आम्ही संध्याकाळी घेतला. रस्त्याच्या दुतर्फा आणि मोठमोठ्या इमारतींवर, होर्डिंग्सवर लावलेल्या भगभगीत दिव्यांनी आपली शहरातील रात्र कृत्रिमपणे झगमगत असते. इकडे सूर्याचे लालभडक प्रतिबिंब क्षितिजावर टेकलेले आम्ही बघत होतो. प्रकाश बाजूला सारत सावली संध्याकाळी हळूहळू भोवती पसरत गेली आणि आता गडद अंधारी रात्र येणार म्हणता म्हणता कोजागिरीचा सुंदर देखणा पूर्णचंद्र आकाशात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसारखी उभी असणारी झाडे चंद्रप्रकाशात न्हावून निघाली. चंद्राच्या आल्हादकारक प्रकाशात समोरची छोटीशी नदी चांदीसारखी चमचमत होती. चंद्राचे मोहक प्रतिबिंब नदीच्या पाण्यात तरळत होते.

     अभ्यास, कामाचा थकवा, काळजी सारे आम्ही क्षणात विसरलो. नदीच्या थंडगार वाळूत गालिच्याचे सुख लपले होते. कुठे वाहनांच्या कर्कश आवाजांनी अस्वस्थ करणारी आमची शहरातली रात्र आणि कुठे येथील गाढ नीरव शांतता!

     हा अनुभव खूप काळ आम्हाला जगण्याचा आनंद देत राहील. तुला हे सांगावेसे वाटले. तू आमच्याबरोबर असतास तर हा आनंद द्विगुणित झाला असता. आमची सहल अशी खूप छान झाली.पत्र वाचल्यावर तुलाकाय वाटले ते जरूर कळव.

     ती. काका आणि ती. सौ.काकुंना सा.नमस्कार, चि. शुभाला आशीर्वाद, पत्राचे उत्तर जरूर पाठव. मी उत्सुकतेने वाट बघत आहे.
तुझा मित्र....
पत्ता ...

     प्रति - ज्याला पत्र पाठवले आहे त्याचे नाव व पत्ता
     प्रेषक - पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !