Sunday, 18 October 2020

Marathi Essay on "Save Water", "पाणी वाचवा जीवन वाचवा निबंध", "Pani vachava Jivan vachava Nibandh" for Students

Essay On Save Water In Marathi: In this article "पाणी वाचवा जीवन वाचवा मराठी निबंध", "Pani vachava Jivan vachava Nibandh in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Save Water", "पाणी वाचवा जीवन वाचवा मराठी निबंध", "Pani vachava Jivan vachava Nibandh" for Students

Marathi Essay on "Save Water", "पाणी वाचवा जीवन वाचवा मराठी निबंध", "Pani vachava Jivan vachava Nibandh" for Students
पाण्यासाठी, पाण्याच्या थेंबासाठी विहिरीजवळ शेकडो माणसे खोल गेलेले विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणी विहिरीत सोडले जाते आणि मग तेथील लोक पोहरा घालून ते पाणी उपसतात. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी हे दृश्य पहायला मिळते. पाण्यासाठी दाही दिशा...
पाणी म्हणजे जीवन! पाण्याशिवाय जीवन केवळ अशक्य!
वास्तविक निसर्ग आपल्याला भरभरून पाणी देत असतो. कधीमधी तो आपल्यावर रुसतोसुद्धा! अशावेळी आपल्याला पाण्यासाठी दाही दिशा फिरायची वेळ येते आणि डोळ्यात अक्षरशः 'पाणी' दाटते. 
पण ज्यावेळी निसर्ग पावसाच्या रूपाने पाणी देतो त्यावेळी पाण्याचा थेंब अन् थेंब आपण वाचवला, अडवला आणि जिरवला तरच अशी पाणी पाणी करत हिंडायची वेळ आपल्यावर येणार नाही. 
असं म्हणतात, भारताच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या देशात जेवढा पाऊस पडतो तो आपल्याला पुढील अडीच वर्षे पुरू शकतो. मग तरीही पाण्याची टंचाई का भासते?
फेब्रुवारी-मार्च सुरू झाला की, वर्तमानपत्रात रोज ‘राज्यात दुष्काळाचा कहर'! गावोगावच्या स्त्रियांची पाण्यासाठी मैलो गणतीची पायपीट! अशा बातम्या वाचून जनसामान्यांचे डोळे पाणवतात. 
विहिरी, तलाव आटतात. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या गतीने होणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि सुधारत जाणारे राहणीमान यामुळे समाजाची पाण्याची गरज जलद गतीने वाढत जाणार आहे. म्हणूनच पाण्याचे साठे वाढवणे व जमलेल्या पाण्याचा विवेकाने वापर करणे आपल्याच हातात आहे आणि आपण हे करू शकतो.
'पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमवणे, यासारखेच पाणी कमी वापरणे म्हणजेच पाणी वाचवणे होय. 
लोकांना जलसाक्षर करायला हवं. पाण्याची किंमत फक्त उन्हाळ्यात कळते, असं होता कामा नये. 
वृक्ष लागवडीचे प्रयोग (भविष्यासाठी) यशस्वी व्हायला हवेत.
“अडवा पाणी हावरटपणे, कर्तव्य आहे ते मुरविणे 
वापरा ते शहाणपणे, ही त्रिसूत्रीच थांबवेल टंचाईचे रडगाणे." 
नाहीतर मिरजेहून दरवर्षी लातूरला रेल्वेने 'जलदूत' पाठवण्याची वेळ येईल.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

1 comment:

  1. पाणी वाचवा निबंध मराठी ज्याने आपण नक्की पैकी चे पैकी गुण मिळवू शकता वाचा सविस्तर:👉 Pani Vachava Nibandh Marathi

    ReplyDelete