Bali to Kan Pili Story in Marathi : In this article, we are providing "बळी तो कान पिळी कथा लेखन", "Bali to Kan Pili Marathi Kahani" for student.
Marathi Story on "Bali to Kan Pili", "बळी तो कान पिळी कथा लेखन" for student
एका अरण्यात एक सिंह, कोल्हा व कुत्रा फिरता फिरता समोरासमोर येतात. एकमेकांचे स्वभावदोष विसरून त्यांची चांगलीच मैत्री होते. तिघेही शिकारी संबंधात एक करार करतात. तो करार असा की, कुठल्याही प्राण्याची शिकार तिघांनी मिळून करायची आणि सारखीच वाटून खायची.
एके दिवशी भल्या पहाटे तिघेही प्राणी शिकारीला निघतात. जंगलात निरव शांतता होती. रात्र अमावस्येची होती. त्यामुळे अंधार होता.
सर्वांत पुढे कुत्रा, त्याच्यामागे कोल्हा आणि सर्वांत शेवटी सिंहाची स्वारी! इतक्यात कुत्रा एका हरणाला पळताना पाहतो आणि कोल्ह्याला खुणावतो, कोल्हा सिंहाला खुणावतो. झालं, क्षणार्धात सिंह हरणावर झेपावतो आणि हरणाची शिकार करतो. ठरल्याप्रमाणे तिघे समान वाटण्या तर करतात; पण सिंहाला काही ते मान्य नसते.
आपला 'वाटा' तर तो खातोच; पण कोल्हयापुढील उचलत 'हा माझा शिकार केल्याचा वाटा' म्हणत फस्त करतो. बिचारा कोल्हा त्याच्याकडे पाहतच बसतो.
आता सिंह कुत्र्याजवळ येतो अन् म्हणतो, 'अरे मी या जंगलाचा राजा, मला माझा वाटा नको? हा वाटा ही मीच खाणार.' असं म्हणत तिसरा वाटाही सिंह क्षणार्धात संपवतो. बिचारा कुत्रा, शक्तिशाली सिंहापुढे त्याचे काय चालणार? दोघेही दुबळे अन् अशक्त होते ना! शेवटी कुत्रा आणि कोल्हा उपाशीच राहतात.
0 comments: