My First Day At School Essay in Marathi Language : Today, we are providing माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9,...
My First Day At School Essay in Marathi Language : Today, we are providing माझा शाळेतील पहिला दिवस निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use My First Day At School Essay in Marathi Language (shalecha pahila divas marathi Nibandh) to complete their homework.
माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध - My First Day At School Essay in Marathi Language
माझे नाव सपना. माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोद्यान, शिशुविहार, के.जी. वगैरे शिक्षण क्षेत्रातील पांढरपेशे प्रकार माझ्या वाट्याला कधीच आले नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. माझा जन्मदिवस मे महिन्यात असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकले. आज मी पंधरा वर्षाची आहे. त्या घटनेला आज दहा वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा आहे. Read also : My First Day in College Essay in Marathi
असं सांगतात की, माझ्या शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहन ठरविण्यात आला होता. शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुशीत होते. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवीन कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सील या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचले ते माझे मलाच कळले नाही. Read also : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध
आमची शाळा एका जुन्या वाड्यात भरत होती. त्या वाड्यात दोन दालने होती व प्रत्येक दालनात दोन-दोन वर्ग भरत असत. दोन गुरुजी शाळा सांभाळत. बाबांनी मला माझ्या वर्गातल्या गुरुजींच्या स्वाधीन केले. बाबा परत फिरले तेव्हा मला अक्षरशः ब्रह्मांड आठवले. बाबांशी बोलताना गुरुजींचा आवाज मधाळ होता. बाबांची पाठ फिरल्यावर तोच आवाज एकदम कठोर झाला. कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतलेली पाहून मला तर कापरंच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतुन त्यांची शेंडी हळूच बाहेर डोकावत होती. खरं पाहता, त्यांची ती शेंडी पाहून त्या तशा भयग्रस्त अवस्थेतही मला खूप हसू येत होते. पण हसण्याचे धाडस होत नव्हते. Read also : Pani Vaachava Essay in Marathi Language
आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. वानराप्रमाणे उड्या मारणारे व चित्कार करणारे आम्ही, गुरुजी आमच्या वर्गावर आले की शेळीसारखे मुकाट बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत दुसरीच्या वर्गाला गणित घालत होते. तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अद्याप मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांच्या भव्य कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. Read also : प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी
तीन-चार तास एका जागी बसण्याची मला मुळीच सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी मुले-मुली भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. तसे गुरुजी कडाडले, "रडायला काय झालं ?" आता फक्त छडीच मारायची बाकी उरली होती. डोळ्यातले पाणी मनगटाने हळूच पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरविण्याचे सोंग केलं. Read also : Essay on Tree in Marathi Language
इतक्यात 'घण-घण-घण' घंटानाद झाला. शाळा सुटली. इतर मुले व मुली दप्तर काखोटीला मारून वर्गाबाहेर केव्हाच पडली होती. मी माझं दप्तर उचलून हळूहळू वर्गाबाहेर पडले. माझी वाट बाबा पाहत उभे होते. बाबांचा हात धरून मी घरी आले. या घटनेला आज पंधरा वर्षे लोटली. अजूनही शाळेतला पहिला दिवस आठवला की, माझ्या हृदयाचा थरकाप होतो. तरी सुद्धा तो दिवस आजही मला फार आवडतो. आणि शेवटी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला आठवतो तो दिवस म्हणजे, 'शाळेतील माझा पहिला दिवस.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS