Friday, 4 October 2019

माझी शाळा निबंध मराठी - Short Essay on Majhi Shala in Marathi

Short Essay on Majhi Shala in Marathi Language : Today, we are providing माझी शाळा निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use My School Essay in Marathi Language to complete their homework.

माझी शाळा निबंध मराठी - Short Essay on Majhi Shala in Marathi

आम्हा मुलांवर उत्तम संस्कार करणाऱ्या माझ्या शाळेचे नाव आहे 'विद्यानिकेतन.' विद्येचे जणू काही घरच असलेली माझी शाळा मला खूप आवडते. या शाळेतच मी लेखन, वाचनाचे पहिले धडे गिरवले. Read also : माझा आवडता शिक्षक मराठी निबंध

माझ्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक वर्ग भरतात. छोट्या छोट्या स्वतंत्र खोल्या असलेल्या एका बैठ्या टुमदार बंगलीत आमची शाळा भरते. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असल्यामुळे माझी शाळा हवेशीर व भरपूर उजेडाची आहे.  Read also : माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध

आम्हाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षिका आपापल्या विषयात पारंगत आहेत. पहिलीच्या वर्गावरच्या विद्याताई मुलांना छान छान गोष्टी सांगतात. चौथीच्या वर्गावरील धारपबाई गणिते फारच छान समजावून देतात. आशाताई सर्व मुलांकडून छान छान नृत्ये, नाटुकली बसवून घेतात व शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सादर करायला लावतात. आपल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती व्हावी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आमची सहल नेण्यात येते. शिवाय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन असे राष्ट्रीय सणही झेंडावंदनाने साजरे केले जातात. Read also : माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

रोजच्या अभ्यासाबरोबरच आमच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व देशप्रीतीचे धडे देणाऱ्या माझ्या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो. पुढे खूप खूप शिकून माझ्या शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची माझी इच्छा आहे.

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

1 comment: