Thursday, 16 December 2021

योगी अरविंद घोष मराठी निबंध - Esssay on Arvind Ghosh in Marathi for class 6, 7, 8, 9 and 10

Esssay on Arvind Ghosh in Marathi Language : In this article Read योगी अरविंद माहिती मराठी, "योगी अरविंद घोष मराठी निबंध" for students of class 6, 7, 8, 9 and 10.

योगी अरविंद घोष मराठी निबंध - Esssay on Arvind Ghosh in Marathi for class 6, 7, 8, 9 and 10

योगी अरविंद घोष मराठी निबंध : विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे असे सांगणारा, सलग सदतीस वर्षे योगसाधना करणारा महातपस्वी! मानवीजीवनात नवप्रकाश आणण्यासाठी अथकपणे तपस्या करणाऱ्या या योगीश्वराला प्रणाम!

श्री. अरविंद घोष, महान पुण्यश्लोक नाम! बडोद्याची नोकरी सोडून कलकत्त्याला वंगभंगाच्या वेळेस 1906 मध्ये राष्ट्रीय महाशाळेचे प्राचार्य म्हणून ते आले. पुढे 'वंदेमातरम' म्हणून पत्र काढले. ती तेजस्वी, अर्थपूर्ण वाणी सर्वांना वेड लावती झाली. त्यांचा भाऊ बरीन्द्र बाँब प्रकरणात होता. खुदीरामने बाँब टाकल्यावर माणिकटोळा कट उघडकीस आला. अरविंदांनाही गोवण्यात आले.

योगी अरविंद घोष मराठी निबंध - Esssay on Arvind Ghosh in Marathi for class 6, 7, 8, 9 and 10

त्यांच्या बहिणीने, “माझ्या भावाला वाचवा तो निर्दोष आहे. वकील कोठून देऊ? मी राष्ट्रासमोर भिक्षा मागते." असे करुण पत्र प्रसिद्धले. शेवटी चित्तरंजनदास खटला चालवायला पुढे आले. त्यांनी खोट्या पुराव्याच्या चिंध्या उडविल्या. न्यायाधीश अरविंदांचा विलायतेतील वर्गबंधू होता. देशबंधू समारोप करताना म्हणाले, "राजकीय वादांची धूळ खाली बसेल. अरविंदांची कीर्ती सातासमुद्रापलीकडे जाईल, राष्ट्रीयतेचा महान कवी, देशभक्तीचा उद्गाता, नवसंदेशाचा ऋषी म्हणून ते ओळखले जातील.

अरविंद सुटले. तुरुंगात असताना त्यांना अंतर्बाह्य श्रीकृष्ण दिसे. ते पुढे पडुचेरी इथे गेले. गेली सदतीस वर्षे ते तेथे होते. ते योगसाधना करीत आहेत. बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज पृथ्वीवर आणली. अरविंद ती दिव्य शक्ती. ती आध्यात्मिक शक्ती खाली आणून जीवनात नवे तेज आणू पाहत आहेत. रवींद्रनाथ म्हणाले, पुष्कळ वर्षांपूर्वी अरविंदांना पाहिले नि म्हटले, “अरविंद प्रणाम," आज पुन्हा भेटून तेच म्हणतो, “अरविंद प्रणाम" रवींद्रनाथांची अरविंदावर सुप्रसिद्ध कविता आहे.

मधूनमधून हा महान साधक, हा योगीश्वर प्रचलित विषयांवर विचार सांगतो. गांधीजींच्या हत्येनंतर ते म्हणाले, "धीर धरा, ज्या शक्तीने भारताला आधार दिला तीच शक्ती पुढे प्रकाश देईल." भाषावार प्रांतरचनेलाही त्यांनी नुकताच पाठिंबा देऊन सांगितले, 'विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. मध्यवर्ती सत्ता सर्वकष करूनही प्रांतीय विविधता नष्ट करु नका. राष्ट्राचा प्राणच त्याने नाहीसा होईल."

आज 15 ऑगस्ट हा अरविंदांचा जन्मदिवस. कलकत्त्यात आजपासून सात दिवस त्यांचा उत्सव आहे. जगातून मोठमोठी माणसे येणार आहेत. प्रणाम अरविंदांना. मानवीजीवनात नवप्रकाश आणू पाहणाऱ्या थोर योगीश्वराला. रवींद्र, अरविंद, महात्माजी! तीन भव्य दिव्य नावे! एका इटालियन कवीने म्हटले. “प्रभू कधी कवीच्या, योग्याच्या, भिकाऱ्याच्या रूपाने अवतरतो." रवींद्र, अरविंद आणि हरिजन के वास्ते हात पुढे करून महात्माजी- या तिघांच्या रूपाने भारत का प्रभू वावरत होता, वावरत आहे!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: