Marathi Essay on "Unity In Diversity", "विविधतेत एकता मराठी निबंध", "विविधतेत एकात्मता मराठी निबंध" for Students

Admin
0

Essay on Unity In Diversity in Marathi: In this article "विविधतेत एकता मराठी निबंध", "विविधतेत एकात्मता मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Unity In Diversity", "विविधतेत एकता मराठी निबंध", "विविधतेत एकात्मता मराठी निबंध" for Students

Marathi Essay on "Unity In Diversity", "विविधतेत एकता मराठी निबंध", "विविधतेत एकात्मता मराठी निबंध" for Students
'जाति-पाँति से बड़ा धर्म है 

धर्म-ध्यान से बडा कर्म है

कर्मकांड से बड़ा मर्म है 

मगर सभी से बडा यहाँ यह छोटा-सा इनसान है,

और अगर वह प्यार करे तो धरती स्वर्ग समान है!' 

भारत हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे.

आपली राज्यघटना, आपला तिरंगा ध्वज, आपले राष्ट्रगीत, आपली धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्ये, आमची आध्यात्मिक प्राचीन संस्कृती, होऊन गेलेली संतमंडळी, थोर महात्मे, ऋषिमुनी, आमची तीर्थस्थाने, आमची एकत्र कुटुंबव्यवस्था आणि ती टिकविण्यासाठी भारतीय स्त्रियांनी केलेला त्याग. जीवनाचे सार सांगणारे चार वेद आणि भगवद्गीता रचणाऱ्या भारतीय संस्कृतीचे वर्णन 'एकमेवाद्वितीय' असेच करावे लागेल.

रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये भारतीय संस्कृतीची अंगे होत.

अठरापगड जाती-उपजातींनी विस्तारलेल्या या महाकाय देशात एखादं संकट तर येऊ द्या. मग बघा सगळे कसे एकत्र येऊन सामना करतात ते!

मग ब्रह्मपुत्रेचा पूर असू दे, किल्लारीचा भूकंप असू दे, उत्तराखंडामधील ढगफुटी, अशा नैसर्गिक आपत्तींना धीराने सामोरे जाताना लक्षात येतं की, प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या माणसांबद्दल, आपल्या देशाबद्दल किती प्रेम आहे, आपुलकी आहे ते! अशा वेळी माणसं जात, धर्म, लिंग, पक्ष हे सगळं विसरून एकमेकांच्या मदतीला धावतात. 

भारतामध्ये साजरे होणारे सण, उत्सव सर्व धर्मीयांना एकत्र आणण्याचेच काम करतात. इथे सलमान खानच्या घरी गणपती उत्सव साजरा होतो. तर हिंदूच्या घरी शीरखुर्मा (क्षीरकूर्मा) बनवून 'ईद' साजरी केली जाते.

इथं अतिथी धर्माचं पालन होतं. 'अतिथी देवो भव' शिकवणारी आमची संस्कृती.

वास्तविक भारतात नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या प्रचंड विविधता आहे. केशभूषा, वेशभूषा, अन्न, राहणीमान, भाषावैविध्य असूनही त्या विविधतेतही एक प्रकारची एकता, सूत्रबद्धता आहे. सहिष्णुता आणि आध्यात्मिक संस्कृतीच्या धाग्यांनी सारे भारतीय एकत्र बांधले आहेत. एकवाक्यतेसाठी आम्ही 'हिंदी' या राष्ट्रभाषेचा म्हणूनच स्वीकार लेला आहे.

इथं शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील 'प्रतिज्ञा' मनापासून म्हणतो. त्या प्रतिज्ञेवा अर्थ समजावून घेतो.

भारत माझा देश आहे, असं म्हणत तो 'मोटा' होतो, त्याची 'मी'-माझी ही कल्पना विस्तारत जाते. हळूहळू त्याचे विश्व विस्तारते.

देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा त्याला अभिमान वाटतो.

मानवता धर्माचं 'बाळकडू' त्याला पाजलं जातं. एकत्वाची भावना त्याच्या मनात रुजविण्यासाठी अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्तकातून विविध मूल्यांची ओळख त्याला होते. एक आदर्श नागरिक घडविताना दीपस्तंभासारखी तेजस्वी व्यक्तिमत्त्वं त्याच्या समोर ठेवली जातात. समाजसेवक बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसा, तसेच प्रसिद्धी पराङ्मुख अन्य कितीतरी गुणीजनांच्या समाजोपयोगी कार्यातून प्रेरणा घेत घेत तो भारत एकसंघ ठेवण्यासाठी झटतो.

'न हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा, 

इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा!'

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !